सैनिकाचा खून करणाऱ्या दोघांना नांदेडमध्ये अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नांदेड: सुट्टीवर आलेल्या एका सैनिकाचा किरकोळ कारणातून खून करून राजस्थानातून पळ काढून नांदेडमध्ये लपलेल्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी बाबानगर भागातून सोमवारी (ता. १७) रात्री अटक केली. दोन जुलै रोजी एका हॅाटेलवर ही घटना घडली होती.

नांदेड: सुट्टीवर आलेल्या एका सैनिकाचा किरकोळ कारणातून खून करून राजस्थानातून पळ काढून नांदेडमध्ये लपलेल्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी बाबानगर भागातून सोमवारी (ता. १७) रात्री अटक केली. दोन जुलै रोजी एका हॅाटेलवर ही घटना घडली होती.

राजस्थानमधील शिकर जिल्ह्यातील ढाणी येथील आसाम रायफलमध्ये कार्यरत असलेले सैनिक प्रकाशचंद्र नुकतेच सुटीवर आले होते. घरी सर्वांची भेट घेऊन ते आपल्या एका नातेवाईकांच्या समारंभात उपस्थित राहण्यासाठी जात असताना शेवत बडी गावाजवळ एका हॉटेलवर त्याचे मित्र जेवण करीत होते. तेही तेथे गेले. त्या वेळी क्षुल्लक कारणावरुन प्रकाशचंद्र याने जेवणाचे ताट फेकून दिले. हे ताट दुसऱ्याच्या टेबलवर जाऊन पडले. यात प्रकाशचंद्र यांची आणि दुसऱ्या टेबलवरील युवकांची मारामारी झाली. यात प्रकाशचंद्र बेशुद्ध पडले. त्यांच्या मित्रांनी त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले; मात्र तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी तीन मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. यातील प्रमोदकुमार हरफुलसिंग व राहूलकुमार विजयसिंग हे दोघेजण फरार होते. ते तेथून नांदेड येथील मित्राकडे आले. आठ दिवसांपूर्वी ते बाबानगर येथे राहून लाकडाला पॉलीशचे काम करीत होते. त्यांच्या वागण्यावरून व बोलण्यावरून येथील त्याच्या मित्राला संशय आला आणि त्याने शिवाजीनगर पोलिसांना कळविले. रात्री पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के. एस. पठाण, पोलिस कर्मचारी मोहन हाके, शंकर मैसनवाड आणि शेख ईब्राहीम यांनी त्या दोघांना अटक केली. या दोघांनाही राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: nanded news two arrested for soldier murder