नांदेड: भिक्षेसाठी नवजात मुलांचा सर्रास उपयोग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

ऊन असो वा पाऊस, कडाक्‍याची थंडी असो वा सोसाट्याचा वारा. कुठल्याही मोसमामध्ये नवजात बालकाला सोबत घेऊन भीक मागण्याचा प्रकार शहरामध्ये सर्रास सुरू आहे. मुलगा आजारी असल्याचे सांगून ही मंडळी वाहतूक थांब्यावर वाहनचालकांकडे पैशाची मागणी करतात.

नांदेड - शहरात रेल्वे स्थानक, बसस्टॅंड तसेच रस्त्यांवरील वाहतूक थांब्यांवर नवजात बालकांना कडेवर घेऊन भीक मागणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा महिलांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, संबंधित प्रशासकीय यंत्रणा भिक्षेसाठी होणाऱ्या चिमुकल्यांचा गैरवापर रोखण्यात अपयशी ठरली आहे.

ऊन असो वा पाऊस, कडाक्‍याची थंडी असो वा सोसाट्याचा वारा. कुठल्याही मोसमामध्ये नवजात बालकाला सोबत घेऊन भीक मागण्याचा प्रकार शहरामध्ये सर्रास सुरू आहे. मुलगा आजारी असल्याचे सांगून ही मंडळी वाहतूक थांब्यावर वाहनचालकांकडे पैशाची मागणी करतात. या प्रकारामुळे चिमुकल्यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत आहे. याला कारणीभूत आहे आजची महागाई आणि शासनाचे चुकीचे धोरण. शासन विविधप्रकारच्या कल्याणकारी योजना आणते. परंतु, त्याची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी यंत्रणाच नसल्याने, ही परिस्थिती निर्माण होत आहे. अशा भिक्षेकरी महिलांचे पुनर्वसन व्हावे आणि त्या बालकांच्या आरोग्यासह जीवन जगणाच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी महिला व बालकल्याण विभागाचे काम आहे.

परंतु, शहरामध्ये मुलांना कड्यावर घेऊन भिक्षा मागणाऱ्या महिलांवर मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याने प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अलिकडे तर भीक मागण्यासाठी अवलंबलेल्या या अमानवीय मार्गाचा वापर वाढला आहे. यावर नियंत्रण बसविण्यासाठी पोलिस तसेच प्रशासकीय यंत्रणेकडून योग्य कारवाई होण्याची आवश्‍यकता आहे, असे मत नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुंबई: क्रिकेटच्या बॅटने केली भावाची हत्या
बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा ऍसिड हल्ला
गोमांसावरून हत्येप्रकरणी भाजप नेत्याला अटक​
चंद्रपूर: खासगी बसला अपघात, 20 जण जखमी​
दोनही हातांनी वाजलेली टाळी​
जमावाच्या हल्ल्यांनी राष्ट्रपती चिंतित​
महिला क्रिकेटमध्ये आज भारत-पाक लढत​
जोड नसलेला उदारमतवाद​
#स्पर्धापरीक्षा - गुरुत्वीय लहरीचा संशोधनात्मक प्रयोग​
मोदी-ट्रम्प भेटीचं फलित (श्रीराम पवार)​
शापित देवभूमीला शांततेची आस (किशोर जामकर)​

Web Title: Nanded news use of newborn children for the beggar