नांदेडमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्मत्या; हत्येचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

नांदेड : एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. दोन) सायंकाळी साडेचार वाजता दत्तनगर भागात घडली. परंतु, आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप माहेरच्या मंडळीनी केला आहे.

दत्तनगर भागात निरंजन वामनगिरी गिरी हे आपल्या परिवारासह राहतात. रविवारी त्यांची पत्नी ज्योती (वय २६) यांनी रागाच्या भरात घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब तिच्या पतीने शिवाजीनगर पोलिसांना सांगितली. पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शासकिय रूग्णालयात दाखल केला.

शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु, ही बाब मयत ज्योती हिच्या माहेरच्या लोकांना समजू दिली नाही किंवा त्यांना कळविले नाही. अंत्यसंस्कारानंतर पती निरंजन गिरी हा फसार झाला. सोमवारी (ता. तीन) या प्रकरणात तिच्या नातेवाईकांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात पती व त्याच्या अन्य नातेवाईकांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी सध्यातरी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
Web Title: nanded news women suicide in nanded city

टॅग्स