तीस प्राथमिक आरोग्य केंद्राची आयएसओकडे वाटचाल

जयपाल गायकवाड
शुक्रवार, 26 मे 2017

आरोग्य योजना अंमलबजावणीत आरोग्य विभाग अव्वल

नांदेड : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गत तीन वर्षांपासून विविध नाविन्य उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. या वेळी ३० प्राथमिक आरोग्य केंद्र ‘आयएसओ’च्या मानांकनाच्या स्पर्धेत उतरले असून, एकाच वेळी मोठया संख्येने मानांकन मिळणारा आरोग्य विभाग मराठवाड्यात पहिला ठरणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.

आरोग्य योजना अंमलबजावणीत आरोग्य विभाग अव्वल

नांदेड : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गत तीन वर्षांपासून विविध नाविन्य उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. या वेळी ३० प्राथमिक आरोग्य केंद्र ‘आयएसओ’च्या मानांकनाच्या स्पर्धेत उतरले असून, एकाच वेळी मोठया संख्येने मानांकन मिळणारा आरोग्य विभाग मराठवाड्यात पहिला ठरणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.

पूर्वी आरोग्य विभागाचा क्रमांक खालतून लागत असायचा. परंतू गत काही वर्षांपासून गरोदर माता प्रसूती, अर्भक मृत्यू नियंत्रण, गरोदर मातांची तपासणी, संस्थात्मक प्रसूतीची संख्या, कुटुंब कल्याण योजना, तसेच वेळेवर प्राथमिक उपचार अन सर्वात महत्वाचे म्हणजे, अधिकारी अन कर्मचाऱ्यांमध्ये सेवे बद्दल वाढलेली जबाबदारीचे भान होय, या सगळया बाजू आरोग्य विभागाच्या दृष्टीने सकारात्मक ठरल्या आहेत.
जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यात पहिल्या टप्यात तीस आरोग्य संस्थांना ‘आयएसओ’ मानांकन दिले जाणार आहे. या तीन ही आरोग्य केंद्रांमध्ये ‘आयएसओ’ मानांकनाप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून ११ पथकाची स्थापना केली गेली. या पथकाने ‘आयएसओ’ मानांकनासाठी जो दर्जा अपेक्षीत असतो. त्यानुसार दर्जात्मक सुधारणांची पुर्तता केली आहे.

यामध्ये सामान्य जनतेस गुणात्मक सेवा, रुग्ण सेवेकरिता आवश्यक साहित्य व सुविधा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवा, अद्यावत अहवाल व अभिलेखे, रेकॉर्ड व रजिस्टर्स व गुणात्मक व संख्यात्मक सेवा कार्यक्षेत्रात पुरविणे, या सगळया बाबींना प्रधान्य दिले आहे. तीस पैकी २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना याच महिन्यात मानांकन दिले जाणार आहे. ही बाब जिल्ह्यासाठी भूषण अन गौरवाची असल्याचे मत आरोग्य सभापती माधव मिसाळे गुरुजी यांनी व्यक्‍त केले.

कायाकल्प योजनेत पाच प्राथमिक आरोग्य केंद्र
राज्य शासनाच्या वतीने आरोग्य सेवेत चांगल काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना बक्षीस दिले जातेे. मागच्या वर्षी जिल्ह्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना बक्षीस मिळाले. यात भोकर तालुक्यातील भोसी, अर्धापुर, मालेगाव, सरसम व तुप्पा या गावांचा समावेश आहे. असेच काम प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंंद्राने केल्यास जिल्ह्याचे नाव रोषण होईल, यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शशांताबाई जवळगावकर यांनी केले.

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:
Web Title: nanded news zp health department an iso