नांदेड : पाणी तपासणी अहवाल देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

शिवचरण वावळे
बुधवार, 24 मे 2017

  • जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पाणी तपासणी अहवाल देण्यास टाळाटाळ
  • साहेबांना तुमचा अर्ज दाखवतो. त्यानंतर तुम्हाला माहिती देतो. असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला व वरिष्ठांकडे बोट दाखविले.

नांदेड : सध्या पिण्याच्या दूषित पाण्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्य बिघडत असून, जिल्हा आरोग्य विभागाचे मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी ए.एफ. पोपुलवार यांच्याकडे जिल्ह्यातील तीन महिन्याच्या पाणी तपासणी अवाहलाची मागणी केली असता त्यांनी अहवाल देण्यास टाळटाळ केली. एवढेच नव्हे तर मोबाईलवर व्हाॅटस्अॅप पाहत बसलेले वैद्यकीय अधिकारी पोपुलवार म्हणाले की, "पत्रकार आमच्याकडून एक माहिती घेऊन जात आहेत, आणि दुसरीच बातमी देत आहेत. त्यामुळे जिल्हा अरोग्य अधिकारी यांनी कार्यलयीन कर्मचारी यांच्यासाठी लेखी पत्रक काढले असून, त्यांची पवानगी मिळाल्याशिवाय एकही बातमी किंवा माहिती न देण्याच्या त्यांनी सूचना केल्या अल्याचे सागितले आहे." 

तुम्हाला जी माहिती हवी आहे. ती लेखी स्वरुपात द्या मी माहिती देतो. तेव्हा ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे लेखी अर्ज करुन माहिती देण्याची त्यांना विनंती केली. तेव्हा त्यांनी पुन्हा माहिती नंतर देतो. साहेबांना तुमचा अर्ज दाखवतो. त्यानंतर तुम्हाला माहिती देतो. असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला व वरिष्ठांकडे बोट दाखविले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही. याची तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास याची तपासणी करणे बंधन कारक असते. व त्याचा सविस्तर अवाहाल तयार करुन तो वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करुन लोकांना जागरुक करुन लोकांचे आरोग्याची काळजी घेणे हे आरोग्य विभागाचे कर्तव्य असते. परंतु नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणाच इतकी ढेपाळली आहे की, त्यांच्याकडे पाणी तपासणी केलेली माहिती प्रसिद्ध करून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावीशी वाटत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी माहिती न देता. ती दडविण्यात धन्यता मानत असून, जिल्हा आरोग्य अधिककारी यांच्या डोक्यावर खापर फोडतांना दिसून येत आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
ट्विटर, सोशल मीडीयावर आगपाखड करत सोनूचा 'अलविदा'

दिव्यांगांना मिळणार आता ‘युनिक कार्ड’
महिला वाहकांस छेडछाड करीत पळविले 28 हजार रूपये​
सियाचीन भागात जेट पाठविले: पाकचा दावा​
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

स्वतःला घडवण्याच्या वृत्तीतून तरुणाची दमदार वाटचाल
"समृद्धी नाही, हा तर बरबादी महामार्ग'
पाकमध्ये अडकलेली महिला भारतात परतणार...
आज शाहिरांना रडावे लागतेय: बाबासाहेब पुरंदरे
सेक्‍स रॅकेट चालवित असल्याच्या संशयावरून महिलेला अटक

Web Title: nanded news zp health official avoiding water test report