तेलंगणा निवडणुकीमुळे नांदेड पोलिस सतर्क 

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नांदेड : आपल्या शेजारील तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणूकांच्या संबंधाने नांदेड पोलिस सतर्क असूून सिमावर्ती भागात दहा पोलिस ठाण्यांतर्गत 14 ठिकाणी नाकाबंदी (चेकपोस्ट) लावण्यात आली आहे. तसेच तेलंगनातील तीन पोलिस अधिक्षक यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सांगितले. 

जिल्ह्याचा देगलूर, मुखेड, धर्माबाद, बिलोली, भोकर, हिमायतनगर, किनवट, माहूर व मरखेल पोलिस ठाण्याच्या सिमा आहेत. सध्या तेलंगनामध्ये विधानसभा निवडणूका सुरू आहेत. या निवडणूकीच्या दरम्यान तेथील उमेदवार व मतदार नांदेड जिल्ह्याच्या सिमावर्ती भागाचा अवैध धंद्यासाठी वापर करण्याची शकक्यता नाकारता येत नाही. यामुळे नांदेड पोलिसांनी सतर्कता बाळगत 14 ठिकाणी चेकपोस्ट लावले आहेत. निर्मल, निझामाबाद आणि अदिलाबाद पोलिस अधिक्षक यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. सात नोव्हेंबर पासून या भागात कारवाई करण्यास सुरवात केली आहे. दारु बंदीच्या 21 केसेसद्वारे एक लाख तीन हजार 193 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या भागातील फरार असलेल्या एका अट्टल आरोपीसह पाहिजे असलेल्या तीन आरोपींना अटक केली.

172 जणांना समन्स बजावण्यात आले असून 60 जणांची अटक वॉरन्ट काढण्यात आले आहेत. मतमोजणी व मतदानाच्या दिवशी या भागातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सर्व दारु दुकाने बंद ठेवण्यात येतील असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थागुशाचे सुनील निकाळजे, जिविशाचे प्रशांत देशपांडे, एपीआय पांडुरंग भारती, मिर्झा बेग यांची उपस्थिती होती.  

Web Title: nanded police alert for telangana election