file photo
file photo

नांदेड पोलिसांचा गुन्हेगारांना दुसरा दणका

नांदेड : जिल्हा व शहरात पिस्तुलचा धाक दाखवून लुटमार करणारा अट्टल गुन्हेगार शेरुसिंग उर्फ शेऱ्याला चकमकीत चार नोव्हेंबरला यमसदनी पाठविले होते. नंतर बुधवारी (ता. २७) एका टोळीवर मोक्का दाखल केला आहे. यामुळे नांदेड पोलिसांचा एका महिण्यातील हा गुन्हेगारी जगतातील हा दुसरा जबर दणका असल्याचे बोलल्या जात आहे. 

टोळीचा म्होरक्या कुख्यात रिंदा फराररच 

नांदेड शहर व जिल्ह्यात कुख्यात रिंदा संधु याच्या नावाचा वापर करून व्यापाऱ्यांना, डॉक्टरांना व व्यावसायींकांना पिस्तुलचा धाक दाखवून खंडणी वसुल करणारी टोळी सक्रीय झाली होती. त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेवून होते. या टोळीतील शेरुसिंग उर्फ शेऱ्या हा पोलिस चकमकीत चार नोव्हेंबर रोजी ठार झाला होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूंरग भारती व त्यांचे काही सहकारी या चकमकीतून बचावले होते. ही घटना ताजी असतांनाच येथील कॉंग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर खंडणीसाठी गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर मोक्का लावण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गुरूचरणसिंग उर्फ लक्की आणि सय्यद नजीमोद्दीन उर्फ गुड्डु हे फरार होते. तिन जणांना अगोदरच पोलिसांनी अटक केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी नागपूर परिसरातून या दोघांना अटक करून इतवारा पोलिसांच्या स्वाधीन केले होते. ते सध्या आपल्या इतर सहकाऱ्यांसह कारागृहात आहेत.

विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणाची सर्व कागदपत्रे पोलिसांच्या वतीने नांदेड परिक्षेत्र नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविण्यात आले. या प्रकरणातील गुन्हेगारंची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन श्री. लोहिया यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. यावरून पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील आणि पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी या प्रकरणात मोक्का लावला. 

हे आहेत मोक्कातील गुन्हेगार

मोक्का लावलेल्या आरोपींमध्ये लक्की उर्फ गुरूचरणसिंग संपुर्णसिंग गिल (वय ३०) रा. अबचलनगर, सय्यद नजिमोद्दीन उर्फ गुड्डू मुनीरोद्दीन (वय ३८) र. आसरा नगर, बजरंग उर्फ यौध्दा भिमराव नरवाडे नरवाडे (वय ३६) रा. आंबाळा, ता. हदगाव, राजू देवराव राऊत (वय २३) रा. बरडशेवाळा ता. हदगाव, सुभाष मोहण पवार (वय ४२) रा. बरडशेवाळा, ता. हदगाव, फरार असलेला हरविंदरसिंग उर्फ रिंदा संधु या सहा जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील रिंदा वगळता सर्व पाच झण सध्या नांदेड कारागृहात स्थानबध्द आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पिस्तुल, जिवंत काडतुस, खंजर, दुचाकी जप्त केली आहे. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील करीत आहेत.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com