नांदेड : बीटक्वाईनमधील दोन आरोपींना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 5 जुलै 2018

क्रिप्टेा करन्सी (अभासी चलन) बीटक्वाईन विकत घेतले. त्यांनी या कंपनीत तब्बल 55 लाख गुंतविले. सुरवातीला या कंपनीने त्यांच्यासोबत तीन महिणे व्यवहार सुरळीत केला. त्यानंतर मात्र बिटक्वाईनचा भाव उतरताच सर्वत्र हाहाकार पसरला आणि व्यवहार बंद झाला.

नांदेड : बीटक्वाईन या अभासी चलनाचे आमिष दाखवून नांदेडकरांना जवळपास दीडकोटीचा गंडा घालणाऱ्या दोघांना आर्थीक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना जिल्हा न्यायाधिश एस. एस. खरात यांनी 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. 

दिड वर्षापूर्वी नांदेड येथील शासकिय आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ. प्रशांत पाटील यांनी आपल्या काही ओळखीच्या मित्रांसोबत क्रिप्टेा करन्सी (अभासी चलन) बीटक्वाईन विकत घेतले. त्यांनी या कंपनीत तब्बल 55 लाख गुंतविले. सुरवातीला या कंपनीने त्यांच्यासोबत तीन महिणे व्यवहार सुरळीत केला. त्यानंतर मात्र बिटक्वाईनचा भाव उतरताच सर्वत्र हाहाकार पसरला आणि व्यवहार बंद झाला. डॉ. पाटील यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्यातून जवळपास 86 जणांनी एक कोटी 36 लाख 20 हजार रुपये यात गुंतवले होते. डॉ. प्रशांत पाटील यांनी आपली फसगत झाल्याची तक्रार विमानतळ पोलिस ठाण्यात दिली. यावरून गुन्हा दाखल झाला. परंतु हा तपास आर्थीक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या आदेशावरून यातील मुख्य आरोपी अमीत भारद्वाज आणि हेमंत सुर्यवंशी यांना पूणे पोलिसांकडून ताब्यात घेतले. नांदेड पोलिसांच्या कोठडीत असतांना काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. कोठडी संपल्यानंतर हे दोन्ही आरोपी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर हा तपास सुरूच होता. यात बालाजी दिगांबर पांचाळ (वय 42) आणि राजू रामराव मोतेवार (वय 46) या दोघांना मंगळवारी (ता. 3) रात्री अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस. एम. ननवरे यांनी या दोघांना नांदेड न्यायालयात बुधवारी हजर केले. न्यायाधिश श्री. खरात यांनी दोन दिवसाची म्हणजेच सहा जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Nanded police custody to two accused in Bitcoin