नांदेडमध्ये तलाठी, कोतवाल यांना लाच घेताना पकडले रंगेहाथ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नांदेड : वडिलांच्या नावावर शेतीचा फेरफार व सातबाराची नक्कल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना धानोरा मक्ता पदभार पेनूर सज्जाचा तलाठी व कोतवाल यांना मंगळवारी (ता. २३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या दोघांवर लोहा ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक (संशोधन) अधिनियम २०१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

लोहा तालुक्यातील पेनुर सर्कलमध्ये राहणारे तक्रारदाराने आपल्या वडिलाच्या नावे शेतीचा फेरफार व सातबार नक्कल काढण्यासाठी पेनुर सज्जामध्ये गेले. त्यांनी सर्व नियमानुसार लागणारी कादपत्रांसह फाईल दाखल केली. परंतु या कामासाठी तलाठी रामेश्‍वर गणेश शिंदे रा. मंगरुळ ता. जाफ्राबाद जिल्हा जालना व कोतवाल मकदुम अलीखान पठाण रा. बेरळी नांदेड यांनी पाच हजाराची लाच मागितली. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने एसीबी कार्यालय नांदेड येथे १७ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. तलाठी याने लाच मागितल्याचे निष्पन्न होऊन त्यांनी पाच हजार रुपये लाच लोहा शहरातील मुक्ताईनगर भागात आपल्या खाजगी कार्यालयात स्वीकारली.

या ठिकाणी लावलेल्या सापळ्यात तलाठी व कोतवाल अलगद अडकले. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय लाटकर व पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बळवंत पेडगावकर, पोलिस बाबु गाजूलवार, एकनाथ गंगातीर्थ, दीपक पवार, अंकुश गाडेकर, अनिल कदम आणि नरेंद्र बोडके यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: In Nanded talathi and Kotwal are Involved in Bribe Case