नांदेड: शोरूम फोडून बुलेट चोरणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

उमरी - नांदेड येथील भाग्यानगर पोलीस ठाणे हद्दितील किसान चौक येथील रॉयल स्टॅंडर्ड हे शोरूम फोडून बुलेट गाडी चोरून नेणाऱ्या चोरट्यास आज उमरी पोलिसांनी येथील सोमठाणा गावाजवळ अटक केली. यामध्ये गावकऱ्यांनी देखील पालिसांची मदत केली.  

उमरी पोलिसांना तालुक्यातील सोमठाण नजीक एक अनोळखी इसम विना नंबरची बुलेट घेऊन जात असल्याची खबर लागली. त्यानंतर पोलिस उप अधीक्षक नरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली व उमरीचे पोलिस निरिक्षक संदीपान शेळके यांच्या आदेशाने कारवाई केली. पोलीस उप निरीक्षक शिंदे, पोलीस उप निरीक्षक सहदेव खेडेकर, व पोलीस अमिरुल्ला बुखारी, राजेंद्र पचलिंगे यांनी सोमठाण येथे जाऊन रात्री दहा वाजताच्या सुमारास सदरच्या बुलेट चोरट्यास ताब्यात घेतले. देवेन्द्र सिंग गोविंद सिंग रामगड्या असे आरोपीचे नाव आहे. शिकार घाट अमदुरा नांदेड येथील तो रहिवासी आहे.

सदरच्या चोरट्या विरुद्ध भाग्यनागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Nanded: The thieves break into the showroom