नांदेड : नगरपरिषदा, नगर पंचायतींसाठी मतदान सुरु

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

नांदेड - जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक व नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी तसेच २ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रक्रियेस सुरवात झाली.

नांदेड - जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक व नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी तसेच २ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रक्रियेस सुरवात झाली.

जिल्हानिवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  यांनी सकाळी मतदान प्रक्रियेच्या सुरवातीलाच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय आणि संपर्क प्रस्थापित केला. नगरपरिषद प्रशासन विभागाच्या प्रशासनाधिकारी विद्या गायकवाड यांनीही संनियंत्रण समितीद्वारे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मतदान केंद्राध्यक्ष आदी क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यास सुरवात केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच २८३ मतदान केंद्रावर सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रकियेस सुरवात झाल्याचे वृत्त आहे.

मुख्य निवडणूक निरिक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे तसेच निवडणूक निरीक्षक यांच्याकडून विविध मतदान केंद्रांना भेट देऊन, तेथील व्यवस्थेबाबत आढावा घेणे व मतदारांच्या सुविधांबाबत निर्देश देणेही सुरु झाले आहे.

सकाळी ९.३० पर्यंतची मतदानाची टक्केवारी

 • देगलूर – ११.६९
 • मुखेड – ६.०८
 • बिलोली – ७.०७
 • मुदखेड – ११.२३
 • कंधार – ९.०३
 • कुंडलवाडी – १०.०२
 • हदगाव – ५.००
 • धर्माबाद – ९.३०
 • उमरी – ५.४७
 • माहूर – ८.५३
 • अर्धापूर – १३.९४
Web Title: Nanded voting process started