नांदेडात दोन महिलांचा निर्घृण खून

file photo
file photo

नांदेड : सोन्याचे दागिणे का देत नाहीस म्हणून एका विवाहितेचा छळ करून चक्क तिला विष पाजून तिचा खून केला. ही घटना ता. २३ नोव्हेंबर रोजी चांडोळा (ता. मुखेड) येथे घडली होती. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात रविवारी (ता. एक) डिसेंबर रोजी अखेर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील विवाहिता ज्योती श्‍यामसुंदर तमशेटे (वय ३४) हिला सासरी किरकोळ कारणावरुन त्रास देणे सुरू केले. एवढेच नाही तर तिच्या अंगावरील सोन्याच्या दागिण्याची मागणी करून तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. दागिणे देण्यास ज्योतीने नकार दिला. यावरून तिच्यासोबत सासरा व अन्य नातेवाईकांनी वाद घातला. या वादातच संगनमत करून ज्योती तमशेटे हिला मारोती हणमंत तमशेटे आणि गंगाधर मारेती तमशेटे यांनी पकडून ठेवले. त्यानंतर बालाजी बाबूराव चंदापूरे रा.धामगाव (ता. मुखेड) याने तिला विष पाजले. यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुरवातीला मुखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र तिचा खून केल्याची तक्रार व्यंकट शंकरराव मेंडगुळे रा. रामपूरथडी (ता. बिलोली) यांनी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी शेवटी मारोती तमशेटे, गंगाधर तमशेट आणि बालाजी चंदापुरे यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासीक अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अकुशकर यांनी यातील मारोती तमशेटे याला अटक केली आहे.

हेही वाचा....नाक, तोंड दाबून महिलेचा खून 

नांदेड : नाक, तोंड दाबून अज्ञात मारेकऱ्यांनी एका महिलेचा खून केला होता. ही घटना आंबेडकरनगरात ता. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली होती. वैद्यकिय अहवालावरून अखेर या प्रकरणात खूनाचा गुन्हा रविवारी (ता. एक) रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार शहराच्या आंबेडकरनगर परिसरातील पिवळी गीरणी येथील सागरबाई भिमराव वावळे (वय ५०) ही ता. २९ नोव्हेंबर रात्री ती पंचशिल हॉस्टेल येथून स्वयंपाकाचे काम करून आपल्या घराकडे निघाली होती. परंतु ती घरी आली नसल्याने तिचा शोध घेतला. ता. ३० नोव्हेंबरच्या सकाळी सात वाजता सावळे यांच्या किराणा दुकानासमोर तिचा मृतदेह आढळला. 

वैद्यकिय अहवालावरून खूनाचा गुन्हा दाखल

घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक अनंत नरुटे, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी भेट दिली. श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय अहवालामध्ये त्या महिलेचा मृत्यू हा तोंड व नाक दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. यावरून सागरबाई वावळे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. अखेर रविवारी (ता. एक) डिसेंबर रोजी सुरेश दिगांबर जोंधळे यांच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com