नंदी महाराज मंडळाचे अखंडीत सेवेचे व्रत : कशासाठी ते वाचाच

प्रमोद चौधरी
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

नांदेड : ‘भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्रीं ज्वाळा’ या अभंगातून संत नरहरी सोनार विश्‍वाला संदेश देतात की, भस्म उटी रुंडमाळ धारण करणारा, ती त्रिशूळ असणारा शिवशंकर हा सर्व सुखाचे आगार आहे. त्याच्या चिंतनाने जीवन सुखी होते. त्याला अनुसरून बह्यामसिंगनगर येथील भाविक नियमित भजनगायन करून आंतरिक सुख प्राप्त करत आहेत.

नांदेड : ‘भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्रीं ज्वाळा’ या अभंगातून संत नरहरी सोनार विश्‍वाला संदेश देतात की, भस्म उटी रुंडमाळ धारण करणारा, ती त्रिशूळ असणारा शिवशंकर हा सर्व सुखाचे आगार आहे. त्याच्या चिंतनाने जीवन सुखी होते. त्याला अनुसरून बह्यामसिंगनगर येथील भाविक नियमित भजनगायन करून आंतरिक सुख प्राप्त करत आहेत.

Image may contain: 5 people, people sitting and indoor
नंदी महाराज भजन मंडळातील सदस्य नियमित भजन-गायन करतात.

असे होते संत नरहरी सोनार
वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगड जाती जमातीच्या संतांनी केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांच्या कलाकुसरला त्यावेळी चांगली प्रसिद्धी होती. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरा चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असत. रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहत होते.

हेही वाचा - आता लेकीच्या लग्नाला या...! कर्जमुक्त शेतकऱ्याने  मुख्यमंत्र्यांना दिले निमंत्रण

नाम स्मरणातून सुखाची प्राप्ती
बह्यामसिंगनगर येथील पुरुष व महिला नियमित शंकराची एकनिष्ठपणे भक्ती-आराधना ‘नंदी महाराज भजन मंडळा’च्यामाध्यमातून सुमारे वीस वर्षांपासून करत आहेत. सर्वसाधारण कुटुंबातील हे लोक आपली दैनंदिन कामे सांभाळून नियमित भजन-गायन करतात. नमस्कार चौकातून नागपूर हायवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बह्यामसिंगनगर आहे. येथील नागरिकांनी भगवान शंकरावरील भक्ती अखंडित सुरु राहण्यासाठी नंदी महाराजांचे मंदिर बांधले. त्याठिकाणी २० वर्षांपासून मंडळातील सदस्य नियमित भजन-गायन करून भक्तीमध्ये एकरूप होत आहेत. 

असे होतात कार्यक्रम
१९९७ पासून नंदी महाराज पुण्यतिथीनिमित्त शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. जगद्‍गुरु तुकाराम महाराज बीज, ज्ञानेश्‍वर माऊली समाधी सोहळा, नाथषष्ठी, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री आदी उत्सव भक्तिभावाने मंळातील सर्व सदस्य एकोप्याने साजरे करतात. याशिवाय प्रत्येक सोमवारी, एकादशी आणि शिवरात्रीला हरिनामाचा गजर करतात.

हे देखील वाचलेच पाहिजे -  या दोन गावांना मिळणार कर्जमुक्तीचा पहिला लाभ

यांचा आहे समावेश
मंडळामध्ये प्रभाकर रोहिणकर, ज्ञानोबा दराडे, लक्ष्मीकांत गारेवार, गणेश निर्मळ, श्रीराम कुबडे, हरिश्‍चंद्र राठोड, महानंदा गुट्टे, पुष्पा वाघमारे, प्रेमला शेट्ये, लक्ष्मीबाई जायभाये, नागींद्राबाई दराडे, मुक्ता मिरुगवाड, आशा इंदूरकर, सावित्रीबाई केंद्रे, कमलबाई सरगड, जया स्वामी,वंदना सुंकवार, रेखा बावळे, शारदा गायकवाड, विमल वानोळे, सविता मुकाटे, सुलोचनाबाई गुंजकर, विठ्ठल पांचाळ, माधवराव गुट्टे, विष्णू इंदूरकर, मिथून केंद्रे आदींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandi Maharaj Bhajan Mandal Nanded News