एका नमस्काराने केला डॉ. दाभोलकरांचा घात! 

मनोज साखरे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - शरद कळसकर, सचिन अंदुरे यांनी पहाटे पुण्यातील ओंकारेश्‍वर पूल गाठल्यानंतर पायी जाणारे काही गृहस्थ त्यांना दिसले; परंतु त्यातील नेमके दाभोलकर कोणते, याचा अंदाज शरदला आला नव्हता. त्यामुळे तो काही वेळ बिचकला होता. त्याची चलबिचल सुरू असतानाच अन्य एका गृहस्थाने डॉ. दाभोलकर यांचे नाव उच्चारून नमस्कार घातला अन्‌ तेथेच शरदचे "लक्ष्य' निश्‍चित झाले. यानंतर दोघांकडून डॉ. दाभोलकर यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडण्यात आल्या. पुण्यातील उच्चपदस्थ सूत्र; तसेच एका तपास यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली. 

पुण्यातील 20 ऑगस्ट 2013ची (बुधवार) पहाट. नीरव शांतता. ओंकारेश्‍वर पुलावरून नेहमीप्रमाणे फिरण्यास डॉ. नरेंद्र दाभोलकर निघाले होते. तर इकडे सचिन अंदुरे औरंगाबादहून बसने पुण्यात पहाटे सहादरम्यान पोचला. तेथेच त्याला शरद भेटला. त्या वेळी त्यांनी ट्रॅकसूट घातलेला होता. या हत्येशी संबंधित इतर दोघांनी दुचाकी व अन्य साहित्य पुरविण्याचे काम केले. त्यांच्या पहाटेच्या लोकेशनबाबत पूर्वकल्पना मारेकऱ्यांना देण्यात आली होती. जेव्हा शरद व सचिन ओंकारेश्‍वर पुलाजवळ आले त्या वेळी शरद हा डॉ. दाभोलकरांवर "नजर' ठेवून होता; परंतु ज्यांना आपण मारणार ते दाभोलकरच आहेत का, याबाबत त्याच्या मनात शंका आली. ""ऐनवेळी बिचकलो. मनात चलबिचल सुरू झाली. निश्‍चिती करण्यासाठी वाट पाहिली. त्याच वेळी दाभोलकरांना एका व्यक्तीने नाव उच्चारून नमस्कार घातला. लक्ष्य निश्‍चित झाल्यानंतर मग दोघांनी मिळून त्यांची हत्या केली,'' अशी माहिती चौकशीदरम्यान शरदने दिल्याचा दावा तपास यंत्रणेतील उच्चपदस्थ सूत्रांनी केला. हत्येनंतर सचिन अंदुरे व शरद पुन्हा बसने औरंगाबादेत परतल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

दीड दिवसाने उघडले सचिनने तोंड 
सचिनला तपास यंत्रणांनी सतरा ऑगस्टला ताब्यात घेतल्यानंतर आपणास काहीही माहिती नाही, माझा संबंध नाही, असे तो आत्मविश्‍वासाने सांगत होता. दीड दिवस त्याने तपास यंत्रणांना कोणतीही माहिती दिली नाही; परंतु एटीएस व सीबीआयने विशिष्ट पद्धतीने त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने तोंड उघडले. 

Web Title: Narendra Dabholkar and Gauri Lankesh killing case