औरंगाबादमध्ये पिस्तुलाची टेस्टिंग

Narendra-Dabholkar
Narendra-Dabholkar

औरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या दोन दिवस आधी औरंगाबादेतील बीबी-का-मकबऱ्याच्या मागील परिसरात संशयित सचिन अंदुरे याने पिस्तुलाची टेस्टिंग केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ ला पुणे येथील ओंकारेश्वर पुलावर पहाटेच्या सुमारास दोन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात औरंगाबादेतील अंदुरे व शरद कळसकर यांना अटक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला औरंगाबादेतील शूलिभंजन परिसरात गोळीबाराचा सराव संशयितांनी केला होता. त्यानंतर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या दोन दिवस आधी अर्थात १८ व १९ ऑगस्ट २०१३ ला सचिन अंदुरे याने त्याला मिळालेल्या पिस्तुलाची टेस्टिंग केली. पिस्तूल व्यवस्थित चालते का, याची खात्री करून सरावही केला. औरंगाबादेतील बीबी-का-मकबऱ्यामागे मोठा निर्जन परिसर आहे. याचाच फायदा घेत त्याने सरावासाठी ही जागा निवडली असावी, असा तपास यंत्रणांना संशय आहे. या जागेची तपास यंत्रणांकडून दोन दिवसांत चाचपणी करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

हत्येच्या दिवशी कामावर गैरहजर
वीस ऑगस्टला हत्येच्या दिवशी अंदुरे कामावर गैरहजर होता, अशी माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली. तो काम करीत असलेल्या एका कपडाच्या दुकानातील नोंदवहीतून ही माहिती समोर आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com