येवल्याजवळ अपघातात औरंगाबादमधील तिघांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

येवला (नाशिक): मुंबईतील मराठा मोर्चा आटोपून औरंगाबाद येथे घराकडे जात असतांना मोर्चेकरी समाज बांधवावर काळाने झडप घातली. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर खामगांव (ता.येवला) पाटी येथे तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला. यामध्ये औरंगाबाद येथील तिघांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी आहेत.

आज (गुरुवार) सकाळी सहा वाजेच्या सुमारास मोर्चा करुण औरंगाबादकडे आपल्या व्हर्ना गाडीतून (एम.एच.-२०, इ.एफ.-७२६४) हे चौघे जात होते. यावेळी व्हर्ना गाडीसह ट्रक (एम. एच. १८ एम ३११४) तसेच मारुती कार (क्र. एम. एच. १५, बी. डब्‍लू) यांचा तिहेरी अपघात झाला. हा अपघात इतका विचित्र होता कि अपघातात व्हर्ना कारचा चक्काचूर झाला असून, इतर वाहनातील प्रवाशी व ग्रामस्थानी मदत करुन यातील प्रवाशी बाहेर काढले. अपघात इतका जबरजस्त होता कि ट्रकचे पुढचे टायरही गळून लांबवर जाऊन पडले होते.

या अपघातात हर्षल अनिल घोलप (वय, २८, रा. गावठाण, रुकडी पुणे), नारयण कृष्‍णा थोरात (वय, २१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे हे तीन जण ठार झाले आहेत. उमेश भोपाल भगत व गौरव प्रजापती (वय, २३, रा. बजाज नगर, जि. औरंगाबाद) हे दोघे जखमी आहे. जखमींवर वैजापूर व औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत.

Web Title: nashik news aurangabad four youth killed in accident