तुटपुंज्या पगारावर किती दिवस सेवा देणार? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

अहमदपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात गत अठरा वर्षांपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अल्पशा मानधनावर आयुष्य जाते की काय? अशी परिस्थिती झाली आहे; तर दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे मोठे नुकसान होत आहे. या प्राध्यापकांचे यंदा तर 36 ते 38 हजार वर्षांकाठी बिल निघाले आहे. 

नेट-सेट, पीएचडी यांसारख्या पदव्या घेऊन प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणारी तरुण मंडळी सेवेत आली, पण कायम होऊ न शकल्यामुळे तुटपुंज्या मानधनावर किती वर्षे सेवा देणार? विशेष म्हणजे तासिका तत्त्व सेवा ग्राह्य धरली जात नाही आणि त्यामुळे मुलाखतीत शून्य मार्क्‍स मिळत आहेत. 

पदवी स्तरावरील शिक्षणासाठी एका विषयाकरिता दोन कायम प्राध्यापक होते. मात्र, वर्ष 2000 मध्ये तासिका तत्त्वाचा स्वीकार करून नेट-सेट, पीएडी धारकांची तासिका तत्त्वावर नेमणूक केली जाऊ लागली आहे. आतापर्यंत या प्राध्यापकांना सेवेत कायम होता आले नाही. कायम प्राध्यापकास एक ते सव्वा लाख रुपये मासिक पगार मिळतो, तर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना वर्षाकाठी तीस ते चाळीस हजार रुपये मिळतात. 

सेवेत कायम झाल्यावर लग्न करू, असा विचार करणाऱ्यांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे, त्यामुळे या प्राध्यापकांचे लग्नही वेळेत होऊ शकले नाही. नेट-सेट, पीएचडी पदव्या संपादन केलेल्या तासिका प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

मी अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात गेल्या पंधरा वर्षांपासून तासिका तत्त्वावर काम करीत आहे. अत्यंत तुटपुंज्या पगारात उपजीविका भागवावी लागत आहे. सरकारने तासिका तत्त्वाचा निर्णय रद्द करावा. 
विनोद माने, रसायनशास्त्र, पीएचडी 

मी गेल्या अठरा वर्षांपासून तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. शासनाने ताबडतोब भरती सुरू करावी आणि तासिका तत्त्व बंद करून सेवा ग्राह्य धरावी एवढीच विनंती आहे. 
- भास्कर गायकवाड, समाजशास्त्र, नेट-सेट, पीएचडी 

Web Title: nashik news how many days will be paid on the salary