नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कारासाठी नाना पाटेकरांची निवड

हरी तुगावकर
शनिवार, 2 जून 2018

लातूरचे पहिले अभिनेते, निर्माता व दिग्दर्शक दिवंगत श्रीराम गोजमगुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महापालिकेच्या वतीने देण्यात हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला होता. याकरीता महापालिकेच्या १९ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न
पुरस्कार समितीचे गठन करण्यात आले होते.

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख व मानपत्र असे आहे. लवकरच एका समारंभात नाना पाटेकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

लातूरचे पहिले अभिनेते, निर्माता व दिग्दर्शक दिवंगत श्रीराम गोजमगुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महापालिकेच्या वतीने देण्यात हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला होता. याकरीता महापालिकेच्या १९ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न
पुरस्कार समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीत स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, महापालिकेचे आयुक्त, सभागृह नेता तथा  रंगकर्मी अॅड. शैलेश गोजमगुंडे, गिरीश सहदेव, संजय अयाचित यांचा समावेश होता.

या समितीच्या काही दिवसापूर्वी गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अमोल पालेकर, मिलिंद जोशी या तीन नावावर चर्चा झाली. पाटेकर यांच्या नावास सर्वानुमते संमती देण्यात आली. हा
पुरस्कार लवकरच एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Natarwarya Shriram Gojamgunde Kala Ratna award Nana Patekar