यातनांमधून मिळाले बळ!

योगेश पायघन
रविवार, 1 जुलै 2018

औरंगाबाद - आयुष्य मस्त चालले होते. अचानक एक दिवस त्याचा अपघात झाला. गंभीर दुखापत झाली. रक्त चाचण्यांतून तो एचआयव्हीबाधित असल्याचे कळले. त्याच्यासह पत्नीलाही मोठा धक्का बसला. आपल्या बाळालाही एचआयव्हीचे संक्रमण झाले असावे, या विचारातून त्यांनी बाळासकट स्वतःला संपविण्याचा निर्णय पक्का केला; पण त्याचवेळी घाटीतील एआरटी सेंटरच्या डॉक्‍टरांनी समुपदेशन केले. त्यातून त्यांनी आत्महत्येचा निर्णय नुसता बदललाच नाही; तर आता कुठल्याची संकटाला सामोरे जाण्यास हे कुटुंब सज्ज झाले आहे. जणू यातनांमधून त्यांना लढण्याचे बळच मिळाले.

औरंगाबाद - आयुष्य मस्त चालले होते. अचानक एक दिवस त्याचा अपघात झाला. गंभीर दुखापत झाली. रक्त चाचण्यांतून तो एचआयव्हीबाधित असल्याचे कळले. त्याच्यासह पत्नीलाही मोठा धक्का बसला. आपल्या बाळालाही एचआयव्हीचे संक्रमण झाले असावे, या विचारातून त्यांनी बाळासकट स्वतःला संपविण्याचा निर्णय पक्का केला; पण त्याचवेळी घाटीतील एआरटी सेंटरच्या डॉक्‍टरांनी समुपदेशन केले. त्यातून त्यांनी आत्महत्येचा निर्णय नुसता बदललाच नाही; तर आता कुठल्याची संकटाला सामोरे जाण्यास हे कुटुंब सज्ज झाले आहे. जणू यातनांमधून त्यांना लढण्याचे बळच मिळाले. कचरू (बदललेले नाव) यांच्यावर वर्ष २०१२ मध्ये अपघात आणि आघात दोन्ही एकाच वेळी झाले होते. आपल्यामुळे आपले बाळही एचआयव्हीबाधित झालेले असावे, या अपराधी भावनेने त्यांना आयुष्य नकोसे झाले होते. त्यातूनच त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, घाटीतील डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांची भेट झाल्यानंतर त्यांनी धीर दिला. आयुष्याचे महत्त्व समजावून सांगितले. नियमित उपचार दिले. आज त्यांच्यामुळे सुखी आयुष्य जगतोय, असेही कचरू आणि त्यांच्या पत्नीने सांगितले. 

एचआयव्ही म्हणजे एड्‌स नव्हे
एचआयव्ही आणि एड्‌स यात फरक आहे. एचआयव्हीची लागण झाल्याच्या काही वर्षांनंतर एड्‌स होतो. योग्य आहार, व्यायाम, नियमित उपचार यामुळे एचआयव्हीबाधितांना एड्‌स टाळता येतो. शिवाय एचआयव्ही बरा जरी होत नसला तरीही बाधित व्यक्ती सामान्यांप्रमाणे जगू शकते. त्यामुळे एचआयव्हीची लागण झाली तर घाबरून जाऊ नये. डॉक्‍टरांचा सल्ला आणि औषधोपचार घ्यावा, असे आता कचरूच इतरांना सांगतात.

Web Title: National Doctor Day Ghati ART Center