राष्ट्रीय महामार्गाची अवस्था शेतशिवारातील रस्त्यांसारखी

अन्वी (ता. सिल्लोड) : राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी रस्त्याच्या मधोमध अशी बाजरीची  ताटे उगवली आहेत. या ताटांना कणसे लागली असून, रस्त्याची अवस्था पाणंद रस्त्यासारखी झाली आहे.
अन्वी (ता. सिल्लोड) : राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी रस्त्याच्या मधोमध अशी बाजरीची ताटे उगवली आहेत. या ताटांना कणसे लागली असून, रस्त्याची अवस्था पाणंद रस्त्यासारखी झाली आहे.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या आठ महिन्यांपासून बंद पडल्यानंतर पावसाळ्यादरम्यान तालुक्‍यात झालेल्या सर्वदूर पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची अवस्था शेतशिवारातील रस्त्यासारखी झाली आहे. जीवघेणे खड्डे व रस्त्यावर तुंबणाऱ्या पाण्यामुळे खड्ड्यांतील पाण्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे.

विशेष म्हणजे शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्यांप्रमाणेच राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी रस्त्याच्या मधोमध बाजरीची ताटे उगवली आहेत. यावरून रस्त्याची अवस्था किती बिकट झाली आहे, याचा अंदाज येतो. तांत्रिक कामांमुळे बंद पडलेले काम काही दिवसांत सुरू होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असली तरी, सर्वत्र खोदून ठेवलेला रस्ता व पर्यायी असलेल्या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com