एकसष्टीला सलग बारा तास पोहण्याचा राष्ट्रीय विक्रम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

औरंगाबाद : सलग बारा तास पोहण्याचा राष्ट्रीय विक्रम करीत निवृत्त नायब तहसीलदार आणि औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिपचे एक्‍झिक्‍युटिव्ह विष्णू लोखंडे यांनी एकसष्टी धूमधडाक्‍यात साजरी केली. 

औरंगाबाद : सलग बारा तास पोहण्याचा राष्ट्रीय विक्रम करीत निवृत्त नायब तहसीलदार आणि औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिपचे एक्‍झिक्‍युटिव्ह विष्णू लोखंडे यांनी एकसष्टी धूमधडाक्‍यात साजरी केली. 

गेल्या अठरा वर्षांपासून सलग जलतरणात दमदार कामगिरी करणाऱ्या विष्णू लोखंडे यांनी एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त सलग बारा तास पोहण्याची मोहीम हाती घेतली होती. शहरातील महात्मा गांधी मिशन संस्थेच्या जलतरण तलावावर रविवारी (ता. 17) सकाळी सहा वाजता त्यांनी पोहण्यास सुरवात केली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌ व आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌च्या तज्ज्ञ निरीक्षकांच्या देखरेखीत ते दिवसभर पोहत होते. सायंकाळी सहा वाजताच चाहते, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विक्रम पूर्ण करूनच ते तलावा बाहेर पडले. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. 

वैद्यकीय तपासणी, थोडा वेळ विश्रांतीनंतर एकसष्टीनिमित्त त्यांचे औक्षण करण्यात आले. छोट्याशा धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी आठ वाजता आमदार अतुल सावे, माजी आमदार कल्याण काळे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, शिरीष बोराळकर, किसनराव लवांडे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते श्री. लोखंडे यांना या राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 
 

 

Web Title: National Record for Swimming 12 Hours Swimming