औरंगाबादेत आजपासून राष्ट्रीय योगासन स्पर्धा 

औरंगाबादेत आजपासून राष्ट्रीय योगासन स्पर्धा 

औरंगाबाद - येथील विभागीय क्रीडा संकुलात 64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धांचे आयोजन ता. 29 जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 900 खेळाडू आणि पंच दाखल झाले असून, पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी आणि योग संघटनेचे प्रमुख अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 जिल्हा योग संघटना, शालेय खेळ महासंघ, राज्य क्रीडा विभागातर्फे ही स्पर्धा होणार आहे. यात 14 आणि 17 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे राहणार आहेत. महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, क्रीडा उपसंचालक अशोक गिरी आदींची उपस्थिती राहणार आहे. 

राज्याच्या संघात 28 स्पर्धक 

विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या 64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात 28 जणांचा समावेश करण्यात आला. 14 वर्षे गटात दोन, तर 17 वर्षे गटात दोन संघ सहभागी होणार आहेत. 

राज्याचे संघ पुढीलप्रमाणे

14 वर्षे मुले : ओम राजभार, ओम कोल्हे, रूपेश संघे, यश पानीभाटे, प्रणय कांगले, कौशिक चकोटे, ओमकार साकत. मुली ः रिद्धी बचीम, आर्या तांबे, सुहानी गिरीपुजे, मृणाल खोत, मृणाल बैनेत, स्वानंदी वालझडे. 17 वर्षे मुले ः आयुष गोरे, मानव कासलीवाल, सुमित पोटे, केदार दिवटे, अभिजित सावंत, दुर्वांकुर चाळके.

मुली : प्राप्ती किनारे, तनुश्री पालांदुरकर, साक्षी काटे, गौरी दाकवे, तन्वी कुंभार, सानिका जाधव.

मार्गदर्शक : जतीन सोळंकी, श्‍वेता पेडणेकर, रविभूषण कुमठेकर, अनिता पाटील. व्यवस्थापक : गोकुळ तांदळे, लता लोंढे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com