राष्ट्रवादी महिला आघाडीकडून हिंदू महासभेच्या पुतळ्याचे दहन 

औरंगाबाद : राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे गुरुवारी शेंद्रा पंचतांराकित औद्योगिक वसाहतीत आरएसएस व हिंदू महासभेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत घोषणाबाजी केली.
औरंगाबाद : राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे गुरुवारी शेंद्रा पंचतांराकित औद्योगिक वसाहतीत आरएसएस व हिंदू महासभेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत घोषणाबाजी केली.

औरंगाबाद - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या हिंदू महासभेच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे गुरुवारी (ता. सात) राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून दहन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

उत्तर प्रदेशात गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी पेढेही वाटले. या संतापजनक प्रकाराचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. सात) राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे शेंद्रा येथे कार्यशाळा सुरू आहे. दुपारनंतर औरंगाबाद- जालना रोडवर सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत हिंदू महासभा, आरएसएसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. फौजिया खान, शहाजहॉं फेरोज, सुषमा कश्‍यप, सुमा नयर, बिल्किश शेख, छाया जंगले, वीणा खरे, मेहराज पटेल, ज्योती काकडे, स्वाती माने, सुरेखा पेडणेकर यांचा समावेश होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com