या शहराला छावणीचे स्वरुप

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नांदेड : आयोध्या खटल्याचा शनिवारी (ता. नऊ) नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार यांनी जिल्हाभर चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे. 

नांदेड : आयोध्या खटल्याचा शनिवारी (ता. नऊ) नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार यांनी जिल्हाभर चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रंजन गोगोई हे ता. १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने या प्रकरणाचा निकाल शनिवारी (ता. नऊ) नोव्हेंबर रोजी देण्यात येणार आहे मुस्लिम धर्मीयांचा ईद महत्त्वाचा सण रविवारी (ता. १०) नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त लावला आहे. नांदेड शहर व ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढविली असून मुख्य चौकात फिक्स पॉईंट व नाकाबंदी लावली आहे. पोलीस अधीक्षक श्री मगर यांनी शुक्रवारी (ता. आठ) नोव्हेंबरच्या रात्री उशिरा आपल्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताच्या विशेष सूचना दिल्या आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर राखत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी, सोशल माध्यमांचा वापर जपून करावा, अफवा पसरू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, अन्य धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन नांदेड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर भारत देशाची सर्वोच्च न्याय संस्था तथा  माननीय सर्वोच्च न्यायालय यांचेकडून पुढील काही दिवसात निकाल अपेक्षित आहे . 
हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे. त्याच्यावर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे.

हा निकाल काहीही असो या " निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप, फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया, पत्रकबाजी टीकाटिपणी करने " हा न्यायालयाचा अवमान ठरतो. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्ति विरोधात पर्याया ने कडक कायदेशीर कारवाई करने बंधनकारक आहे .

पोलिसांच्या सुचना
तरी नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करुन आपल्या देशाची राज्याची ,जिल्ह्याची ,तालुक्याची आणी आपल्या गावाची शांतता व सामाजिक ऐक्य अबाधित ठेवन्या साठी खालील सूचनांचे पालन करावे ही विनंती. 
ँ जमाव करून थांबू नये.
ँ सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
ँ  निकालानंतर गुलाल उधळू नये.
ँ फटाके वाजवू नयेत.
ँ सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत
ँ महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये. 
ँ निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नये घोषणाबाजी जल्लोष करू नये.ँ मिरवणुका रॅली काढू नये.

उल्लंघन केल्यास 

सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास अगर तसा प्रयत्न केल्यास भारतीय दंड सहिता कलम 
ँ कलम 295 कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे
ँ कलम 295 (अ)* कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा  करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे
ँ कलम 298* धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे
याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून न्यायालयासमक्ष हजर करण्यात येईल. तरी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The nature of the camp is to this city

फोटो गॅलरी