पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी नाट्यवल्लीचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नाट्यवल्ली या नव्याने स्थापन झालेल्या युवा ग्रुपने रविवारी (ता. 11) पूरग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्याच्या उद्देशाने अभिनव नाट्याविष्काराचे आयोजन केले होते. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. 

औरंगाबाद - नाट्यवल्ली या नव्याने स्थापन झालेल्या युवा ग्रुपने रविवारी (ता. 11) पूरग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्याच्या उद्देशाने अभिनव नाट्याविष्काराचे आयोजन केले होते. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. 

कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रख्यात नाट्यकर्मी डॉ. दिलीप घारे, "स्वरराज'चे निर्माते गायक व संगीतकार प्रमोद सरकटे यांनी केले. संजय कुलकर्णी, ऍड. रवी शिंदे व डॉ. माने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या "नाट्यवल्ली'च्या नवयुवकांचे प्रमोद सरकटे व डॉ. दिलीप घारे यांनी कौतुक केले.

स्वराज सरकटे, दिग्दर्शक वरद वाघमारे, प्रांजल हुसे, क्षितिज ढगे, प्रियांका पठाडे, पौर्णिमा हटेकर, लेखा चंद्रात्रे, स्मरण कुलकर्णी, तुषार गवळी, मैथिली पुजारी, शिवानी पाटील, गौरी जोशी, अनुराधा ढगे, वैभव गालफाडे, धीरज तौर, संकेत भाले आदींनी अभिनेते प्रवीण तरडे लिखित "आर्टिफिशियल इंटेलिजन्स' व मनीष सोपारकर लिखित "ती... ते... आणि...' हे नाट्यप्रयोग जल्लोषात सादर केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, प्रकाश साउंड, स्मरण कोचिंग क्‍लासेस, सेवा फाउंडेशनचे यावेळी सहकार्य लाभले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Natyawalli organizations will help flood victims