मनुदेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

बोरमाळतांडा (ता.सोयगाव) येथून जवळच असलेल्या मनुदेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांची होणारी गर्दी ओळखून मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. तीर्थस्थळाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. घाटनांद्रा - बनोटी रस्त्यावरील अंजिठा डोंगररांगेच्या पायथ्याशी वसलेल्या बोरमाळतांडा गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यामध्ये मनुदेवीचे मंदिर आहे.

बनोटी (जि.औरंगाबाद) ः बोरमाळतांडा (ता.सोयगाव) येथून जवळच असलेल्या मनुदेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांची होणारी गर्दी ओळखून मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. तीर्थस्थळाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. घाटनांद्रा - बनोटी रस्त्यावरील अंजिठा डोंगररांगेच्या पायथ्याशी वसलेल्या बोरमाळतांडा गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यामध्ये मनुदेवीचे मंदिर आहे.

मंदिर अत्यंत घनदाट जगंलामध्ये असुन या ठिकाणी जाण्यासाठी झाडाझुडपातुन पायवाटेने जावे लागते. मंदिराचे ठिकाण असलेला डोंगर इंग्रजी "व्ही'आकाराचा असल्याने दुपारी बारा वाजता सुर्यदर्शन होते, तर सायंकाळी पाच वाजता सुर्य मावळतांना दिसतो. अत्यंत निसर्गरम्य वातावरण असून पूर्ण परिसर हिरवाईने नटलेले मनमोहक दृष्य पाहण्यास मिळते. मंदिरासमोर तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतो. मंदिराच्या वरच्या दिशेने एक मोठी कपार आहे त्या कपारीस विशाल कपार म्हणुन आळखले जाते. या ठिकाणी पाण्याचे टाक असुन त्यामध्ये बाराही महिने अत्यंत थंडगार पाणी असते. तेथे जाण्यासाठी पायवाटने उंच चढत जावे लागते. मनुदेवीच्या दर्शनासाठी पाचोरा, नाशिक ,भडगाव, चाळीसगाव,सोयगाव, सिल्लोड, पारोळा आदी भागातुन भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्र उत्सवात नऊ दिवस भाविकांची मोठी गर्दी असते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratra Festival In Manudevi Temple