म्हैसमाळला नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू

म्हैसमाळ (ता. खुलताबाद) ः गिरिजादेवीची मूर्ती.
म्हैसमाळ (ता. खुलताबाद) ः गिरिजादेवीची मूर्ती.

खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ येथील गिरिजादेवी संस्थानतर्फे नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. या उत्सवाचा प्रारंभ रविवारी (ता. 29) होणार असून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवारी (ता.29) गिरिजादेवी मंदिर व जुने ठाणे मातेचा महाभिषेक व महापूजा करण्यात येणार असून त्यानंतर घटस्थापना करण्यात येणार आहे.

रविवारी (ता. सहा) होमहवन करण्यात येऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सोमवारी (ता.सात) सकाळी मातेस महाअभिषेक करण्यात येणार असून मंगळवारी (ता.आठ) सायंकळी शमीपूजन करून दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन करण्यात येईल. या उत्सवाची सांगता रविवारी (ता. 13) कोजागरी पौर्णिमेस दत्त भजनाने होणार आहे. यामध्ये परिसरातील भजनी मंडळ सहभागी होतील. मंदिर परिसरात यानिमित्त दूध आटवून त्याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात येईल.

नवरात्र उत्सवात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थांनचे अध्यक्ष तथा तहसीलदार राहुल गायकवाड, विश्वस्त मनोहर भारती, पुजारी नंदू भारती, पुजारी राजू भारती, मंडळ अधिकारी बी. एन. गवळी, तलाठी कैलास कुबेर, देवस्थान लिपिक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे. येथून जवळच असलेल्या व म्हैसमाळ डोंगररांगेच्या कुशीत पुरातनकालीन गिरिजामातेचे मंदिर असून येथे दर्शनासाठी कायम भाविकांची रीघ लागलेली असते. नवरात्र व माघ पौर्णिमेला भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होते. या मंदिराचा तहसील प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या देणगीतून भव्य मंदिर उभारले जात असून गर्भगृह मोठे झाल्याने भाविकांना दर्शन सुकर झाले आहे. या ठिकाणी सभामंडप उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. मंदिर परिसरात यावर्षी तहसील प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने आठशे झाडे लावली असल्याचे तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com