Vidhan Sabha 2019 : सारखं कुंकू बदलायचं नसत; घरोबा एकदाच असतो : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

सय्यद सलिम यांना मंत्रीपद द्यायचे होते...
त्या काळात मराठवाड्यातून अल्पसंख्यांकातून एकमेव सय्यद सलिम विजयी झाले होते. त्यामुळे मंत्रीपदासाठी त्यांचे नाव समोर आले. त्यांना मंत्रीपदाची शपथ घ्यायचा निरोप दिला तर त्यांनीच जयदत्त क्षीरसागर यांचे नाव पुढे केल्याचे शरद पवार यांनी केला.

बीड : जिव गुदमरला म्हणून पक्षांतर केले म्हणता. मग, १५ - २० वर्षे सत्तेची उब आल्याने जीव गुदमरला का, असा सवाल करत सारखं कुंकू बदलायचं नसत, घरोबा एकदाच करायचा असतो, कुंकू बदललं कि समाजात काय म्हणतात हे मला इथे स्त्रीया असल्याने सांगता येत नसल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. माजी मंत्री सुरेश नवले, उमेदवार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, सय्यद सलिम, सुनिल धांडे, उषा दराडे, सिराज देशमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, १९८० मध्ये  आपण विरोधी पक्षात होतो. पण, त्यावेळी झालेल्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील आपले सर्व आमदार विजयी झाले होते. महाराष्ट्रात एकमेव बीडकर इतिहास करतात, आताही त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. आपण ५० वर्षांत जिल्ह्यातील अनेकांना पाहिले. शब्दाला जागणे ही बीडकरांचे वैशिष्ट्य असल्याचेही शरद पवार म्हणाले. म्हणूनच बीड हे आपलं घर अशी भावना आहे. आम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद, कृषीमंत्रीपद, संरक्षण मंत्रीपद अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या. आता नवीन नेतृत्वाची पिढी तयार करुन त्यांना मार्गदर्शन करायचे आहे. बीडला नव्या नेतृत्वाला पसंती असल्याचे चित्र आहे. यात संदीप क्षीरसागर राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात शेती, उद्योगाचे प्रश्न असल्याने परिवर्तन करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा या हेतूने आपण मंत्रीपदांसारख्या संधी दिल्या. परंतु, सर्व काही मिळून दुसरी पिढी सोडून जात असल्याचे शरद पवार म्हणाले. काँग्रेसचे रवींद्र दळवी, डि. बी. बागल, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, बाबूराव पोटभरे, कल्याण आखाडे, गंगाभीषण थावरे उपस्थित होते.  

सय्यद सलिम यांना मंत्रीपद द्यायचे होते...
त्या काळात मराठवाड्यातून अल्पसंख्यांकातून एकमेव सय्यद सलिम विजयी झाले होते. त्यामुळे मंत्रीपदासाठी त्यांचे नाव समोर आले. त्यांना मंत्रीपदाची शपथ घ्यायचा निरोप दिला तर त्यांनीच जयदत्त क्षीरसागर यांचे नाव पुढे केल्याचे शरद पवार यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP cheif Sharad Pawar targets rebel leaders in party at Beed