‘यांना हाकलायला वेळ लागणार नाही’; शरद पवार आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शुक्रवारी (ता.20) संध्याकाळी किंवा उद्या राष्ट्रवादी आपला कार्यक्रम जाहीर करेल.

जालना : ''विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शुक्रवारी (ता.20) संध्याकाळी किंवा उद्या राष्ट्रवादी आपला कार्यक्रम जाहीर करेल. दिवाळी दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.  

- नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर युतीचे काय?

जालना येथे शुक्रवारी (ता.20) आयोजित कार्यकर्ता मेळ्याव्यात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आमदार राजेश टोपे, माजी खासदार पुंडलिक हरी दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, विजय अण्णा बोराडे, डॉ. निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, 'आज शेती व्यवस्था वाईट झालीय. राज्याची आणि देशाची अवस्था ज्यांच्या हाती आहे, त्यांनी शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. ही परिस्थिती सुधारण्याबाबत सरकार काहीही करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढायला लागल्या आहेत. केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारखानदारांचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नसल्याचे सांगितले.' 

- युतीचा निर्णय गुलदस्त्यातच; काय म्हणाले उद्धव ठाकरे?

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आत्महत्या केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. यांना हाकलून द्यायची हीच योग्य वेळ आहे. जर तुम्ही आणि मी एकत्र आलो तर सत्ताधाऱ्यांना हाकलायला वेळ लागणार नाही. आघाडीचे सरकार आल्यास सर्वांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. 

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ते बघायला सत्तेतील मंत्री तयार नाहीत. मात्र, हे सगळे मंत्री महाजनादेश यात्रेत दररोज हजेरी लावत आहेत, अशी टीकाही शरद पवार यांनी विरोधकांवर केली.

- Vidhan Sabha 2019 : 'शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar comment on State Government