राष्ट्रवादी डॉक्‍टर्स सेलच्यावतीने पूरग्रस्त भागातील 60 हजार रुग्णांवर उपचार 

पूरग्रस्त भागात रूग्णसेवा करताना डाॅक्टर.
पूरग्रस्त भागात रूग्णसेवा करताना डाॅक्टर.

औरंगाबाद - सांगली-कोल्हापुरात उद्‌भवलेल्या पूरपरिस्थिीनंतर खरी गरज होती ती आरोग्यसेवेची. राष्ट्रवादी डॉक्‍टर्स सेल; तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी मोलाची जबाबदारी विनामोबदला उचलली. संघटनेने डॉक्‍टरांच्या मदतीने पूरग्रस्त भागात 125 पेक्षा अधिक वैद्यकीय शिबिरे घेतली. 60 हजार पूरग्रस्त रुग्णांना मदत करताना 175 डॉक्‍टरांनी या मोहिमेत योगदान दिले. 

आपत्ती व्यवस्थापनातील राष्ट्रवादी डॉक्‍टर्स सेलचे व्यासपीठ कौतुकाचा विषय ठरत आहे. सांगली, कोल्हापूरला पुराचा विळखा बसतोय, हे लक्षात येताच राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी पक्षाच्या डॉक्‍टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांना पूरग्रस्त भागात सेवा देण्याच्या सूचना दिल्या. सोबतच केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनलादेखील या उपक्रमासाठी औषधी उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क साधला. यावर डॉ. काळे यांनी डॉ. सुनील जगताप (पुणे), डॉ. अनिल काळे (पिंपरी-चिंचवड), डॉ. शिवदीप उंद्रे (पुणे), डॉ. पृथ्वीराज पाटील (सांगली), डॉ. अतुल मोरे (इस्लामपूर) यांनी कार्यवाही सुरू केली. सोशल मीडियाद्वारे आवाहन करण्यात आले. शेकडो डॉक्‍टरांनी त्यास प्रतिसाद दिला. 

वाळवा तालुक्‍यापासून कामाला सुरवात केली. पूर ओसरलेल्या ठिकाणी वैद्यकीय शिबिरे आणि औषधोपचाराला सुरवात केली. आवाहनाला दाद देणाऱ्या डॉक्‍टरांनी आपला दवाखाना एक दिवस बंद ठेवत या मोहिमेत सहभाग नोंदविला. पुण्यातून रोज एक 17 आसनी बस डॉक्‍टरांना घेऊन यायची. दिवसभर सेवा देऊन परत जायची. आठवडाभर ही कसरत सुरू होती. सर्वाधिक पुराचा तडाखा बसलेल्या शिरोळ तालुक्‍यात मेगा हेल्थ डे आयोजित केला. 18 ऑगस्टला 100 डॉक्‍टरांच्या मदतीने 18 गावांत एकाच दिवशी वैद्यकीय शिबिरे घेण्यात आली. गेरवाई, परळी, माजलगाव, अकोला, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, जळगाव या ठिकाणांहून डॉक्‍टर आले होते. सोबतच नर्सेस, पॅरामेडिकल क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला. 

शासनाच्या औषधी खरेदी धोरणाचा फटका पूरग्रस्तांना बसला. यामुळे सुरवातीला औषधींचा तुटवडा जाणवला. पक्षाच्या माध्यमातून इतरांच्या तुलनेत चांगले काम करता आल्याचा आनंद आहे. त्या परिसरात खूप काळ पाणी राहिल्याने त्वचारोगाचे प्रमाण वाढेल, अशी स्थिती आहे. 
-डॉ. नरेंद्र काळे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी डॉक्‍टर्स सेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com