राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रस्थापितांचा पक्ष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

बीड - राष्ट्रवादी हा प्रस्थापित मराठ्यांचा पक्ष असून, छोट्या मराठ्यांना पक्षात किंमत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीतून निलंबित केलेले माजी मंत्री सुरेश धस यांनी रविवारी (ता. 16) बीडमध्ये पत्रकार परिषदेत केला. प्रकाश सोळंके यांचे पराभवामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे, तर अमरसिंह पंडित दगाबाज असल्याचा पलटवार करताना या दोघांच्या मागे बोलवता धनी वेगळाच असल्याचा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. 

राष्ट्रवादीच्या लोकांनी केवळ बीडमध्येच भाजपला मदत केली असे नव्हे; तर सोलापूर, कोल्हापुरातही हा प्रकार घडला. कोल्हापूर, सोलापुरातील नेत्यांसारखा कारखानदार, शिक्षणसम्राट नसल्यानेच माझ्या एकट्यावर पक्षाने कारवाई केली असा थेट आरोप धस यांनी पक्षश्रेष्ठींवर केला. 

Web Title: Ncp internal politics