देवेंद्रजी, मी आमदार होतो तेव्हा तुम्ही शाळेत होता : छगन भुजबळ 

Chagan Bhujbal
Chagan Bhujbal

परळी : तुरुंगाला मी घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस माझे भाषण परत ऐका मी काहीच चुकीचे बोललो नाही. माझ्या तुरुंगाचा आणि जामिनाचा उल्लेख तुम्ही करुन घाबरविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, मी घाबररणार नाही. मी सिंहासारखा जगेन. देवाने मला किती आयुष्य दिले ते माहित नाही. मात्र, जेवढा काळ जगेन तेवढा काळ सिंहासारखा शुरपणाने जगेन असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप आणि महाआघाडीची दुसरी संयुक्त सभा शनिवारी (ता. २३) परळीत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात मी काय स्वातंत्र्य लढ्यामुळे तुरुंगात गेलो नव्हतो. पण, माझे पुर्वज गेले होते. तसा तुमचे राजकीय पुर्वज कसल्या लढ्यात गेले ते सांगा. मला नकलाकार म्हणता. पण, मी काय बोलायचे ते तुमच्याकडून शिकू का. जेव्हा मी मुंबईचा महापौर, आमदार होतो तेव्हा तुम्ही शाळेत शिकत होता. मी बाळासाहेब ठाकरें बरोबर काम केलेले आहे. मी भ्रष्टाचार केला असे म्हणता. मात्र, तुमचे तर अनेक जण खून पाडणारे आहेत. पुलवामामध्ये जवान हुतात्मा झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा सभांमध्ये गुंग होऊन ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देत होते. तर, इकडे मुख्यमंत्री मातोश्रीवर वाटाघाटी करत असल्याचा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. ज्यांनी खेळण्यातील विमान बनवले नाही त्यांना लढाऊ विमाने बनवण्याच कॉन्ट्रॅक्ट दिले अशी टीकाही त्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com