राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप सोपल यांचा आमदारकीचा राजीनामा

 औरंगाबाद : आमदार दिलीप सोपल यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाउ बागडे यांच्याकडे मंगळवारी राजीनामा दिला. यावेळी उपस्थित डावीकडून अंबादास दानवे, मिलींद नार्वेकर, सुभाष देसाई व चंद्रकांत खैरे.
औरंगाबाद : आमदार दिलीप सोपल यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाउ बागडे यांच्याकडे मंगळवारी राजीनामा दिला. यावेळी उपस्थित डावीकडून अंबादास दानवे, मिलींद नार्वेकर, सुभाष देसाई व चंद्रकांत खैरे.

औरंगाबाद - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी आज (ता. 27) थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव गाठले. चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथे जाऊन आमदार सोपल यांनी राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर ते उद्या (ता. 28) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राजीनामा देतेवेळी चित्तेपिंपळगाव येथे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. 

आमदार दिलीप सोपल हे मंगळवारी दुपारी औरंगाबादमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट चित्ते पिंपळगाव गाठले. त्याठिकाणी हरिभाऊ बागडे यांचे संपर्क कार्यालय आहे. बुधवारी आमदार सोपल यांचा शिवसेना प्रवेश असल्याने दुपारीच राजीनामा सादर केला. त्यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे. दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर सायंकाळी आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी शिवसेनेची वाट धरली. या वाटेत त्यांना नेण्यासाठी थेट मुंबईहूनच नेते आले होते. 
 
राजीनामा स्वीकारला 
राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवबंधन बांधणारे आमदार दिलीप सोपल यांनी त्यांचा राजीनामा दिल्यानंतर काही क्षणातच विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी तो स्वीकारला. आमदार दिलीप सोपल यांनी त्यांच्या लेटर हेडवर "माननीय, अध्यक्ष साहेब महाराष्ट्र विधानसभा. मी दिलीप गंगाधर सोपल, वि. वि. स. स. बार्शी विधानसभा मतदारसंघ. मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे दिनांक 27 ऑगस्ट 2019 रोजी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देत आहेत. तो आपण स्वीकारावा ही नम्र विनंती. आपला नम्र'' अशा मोजक्‍या शब्दात राजीनामा लिहून दिला. राजीनामा हातात दिल्यानंतर लगेच बागडे यांनी "स्वखुशीने राजीनामा दिला आहे. मंजूर करण्यात येत असल्याचा' शेरा देऊन स्वीकारला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com