esakal | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार फौजियाखान कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रा. फौजिया खान यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व पक्ष कार्यकर्त्यांना तातडीने तापसण्या करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार फौजियाखान कोरोनाबाधित

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार प्रा. फौजिया खान यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व पक्ष कार्यकर्त्यांना तातडीने तापसण्या करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभेच्या खासदार प्रा. फौजिया खान यांना कोरोना विषाणुची बाधा झाली आहे. खासदार   फौजीयाखान गेल्या चार महिण्यापासून त्यांच्या परभणी येथील घरातच होत्या. त्या कुठेही बाहेर पडल्या नसल्याचे त्यांच्या निकटवर्तींनी सांगितले. गेल्या    दोन दिवसापासून त्यांना थोडा सर्दीचा त्रास जाणवत असल्याने त्या डॉक्टरकडे आल्या होत्या. त्यात त्यांची सोमवारी (ता. २०) कोरोना विषाणुची संसर्गाची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा मंगळारी (ता. २१) अहवाल आला. त्यात त्यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा -  नांदेडच्या या काँग्रेस आमदारांना कोरोनाची लागन, मुलगीही झाली बाधीत

निवासस्थान परभणी शहरातील नांदखेडा  रस्त्यावर आहे

त्यांना यापूर्वी जिल्ह्यातील बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी हे सध्या औरंगाबाद येथील धुत   हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार प्रा. फौजिया खान यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खासदार फौजिया खान यांचे निवासस्थान परभणी शहरातील नांदखेडा  रस्त्यावर आहे. ते निवासस्थान प्रतिबंधित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होणार तपासणी


खासदार प्रा. फौजिया खान यांच्या संपर्कात आलेल्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच त्यांचे निकवर्तीय यांची स्वॅब चाचणी होणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. परंतू खासदार फौजिया खान यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image