भाजपच्या स्टेजवरचे 90 टक्के नेते पवारसाहेबांनी तयार केलेले : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

माझ्या महाराष्ट्राला भिकारी कोणी म्हटलेले मला चालणार नाही. माझ्या महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेने बघायचे. महाराष्ट्रातील एक मंत्री म्हणतो, खेकड्यांमुळे धरण फुटले. महाराष्ट्रातील या मंत्र्यामुळे मला दिल्लीत विचारले. पण, आता हेच खेकड्याचे कारण देणारेच मंत्री आहेत.

उस्मानाबाद : भाजपवाल्यांनो, तुमच्या व्यासपीठावरील 90 टक्के नेते पवारसाहेबांनी मोठे केले आहे. आता तुम्हीच विचारत आहात पवारसाहेबांनी काय केले. आमच्या विरोधात खूप आले, पण त्यांना यश आले नाही. अजितदादांच्या विरोधातील उमेदवाराला तर बारामतीतील गावे तरी माहिती आहेत का?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.  

भूम विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची सभा झाली. या सभेत सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, की माझ्या महाराष्ट्राला भिकारी कोणी म्हटलेले मला चालणार नाही. माझ्या महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेने बघायचे. महाराष्ट्रातील एक मंत्री म्हणतो, खेकड्यांमुळे धरण फुटले. महाराष्ट्रातील या मंत्र्यामुळे मला दिल्लीत विचारले. पण, आता हेच खेकड्याचे कारण देणारेच मंत्री आहेत. माझा नवरा आणि आईला राजकारणात अजिबात रस नाही. राहुल मोटेंना मात्र त्यांची पत्नी त्यांना मदत करते. माझ्या आईने कधीही शरद पवारांना मदत केली नाही. जलयुक्त शिवारमध्ये फक्त पुरंदर तालुक्यात 200 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे खुद्द तानाजी सावंत यांनी मान्य केले आहे. आता कोणी कोणाचे ऐकून मतदान करत नाही. ज्या उमेदवाराचे कर्तृत्व आहे, त्यांनाच मतदान करा. पाच वर्षांत विरोधात असतानाही राहुल यांनी खूप काम केले आहे. प्रशासनात आमचा हात कोणीच धरू शकत नाही. राहुल मोटे यंदा चौकार मारणार हे निश्चित आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Supriya Sule targets BJP government in Osmanabad