इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची पेट्रोल पंपावर घोषणाबाजी

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे मंगळवारी (ता. 28) क्रांतीचौक येथील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी 'अबकी बार तुम्हीच ठरवा यार !, 'भाजपच्या आश्‍वासनांचे बुडबुडे' यावर आधारित कॉर्टूनचा समावेश असलेली पत्रके वाटप करण्यात आली.

औरंगाबाद - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे मंगळवारी (ता. 28) क्रांतीचौक येथील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी 'अबकी बार तुम्हीच ठरवा यार !, 'भाजपच्या आश्‍वासनांचे बुडबुडे' यावर आधारित कॉर्टूनचा समावेश असलेली पत्रके वाटप करण्यात आली.

मागील काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ करण्यात आल्यामुळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. या विरोधात सतत आंदोलने होत असतानाही पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर जाऊन सरकारकडून दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, यावर आधारित पत्रके वाटप करण्यात आली. यात म्हटले आहे की, खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, नोटबंदीने काळापैसा नष्ट होणार, भ्रष्टाचारमुक्‍त भारत, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव, महागाई कमी होणार, स्वस्त इंधन यासह घोषणांचा सुकाळ, बाकी सारा दुष्काळ याचा उल्लेख असलेल्या मजकरासोबतच कार्टून भेट आहे. 

या आंदोलनावेळी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, मोतीलाल जगताप, सोपान खोसे, दत्ता भांगे, अभिषेक देशमुख, प्रतिभा वैद्य, मंजुषा पवार, राजेंद्र नवगीरे, अय्युब खान, धनंजय मिसाळ, अमोल दांडगे, मुन्नाभाई, सलमा बानो आदी उपस्थित होते.

Web Title: NCP strikes Against fuel price Increase