भूयारी गटार योजनेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

दत्ता देशमुख
गुरुवार, 17 जानेवारी 2019

शहरातील गटार योजनेच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले. शहरातील १५४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला जाणिवपूर्वक दिरंगाई लावली जात असल्याचा आरोप आहे.

बीड : शहरातील गटार योजनेच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले. शहरातील १५४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला जाणिवपूर्वक दिरंगाई लावली जात असल्याचा आरोप आहे.

पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झाले. तर, संदीप क्षीरसागर यांच्या नेृत्वाखालील काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून उपनगराध्यक्षपदावर बाजी मारली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर यांना बळ दिले जात आहे. मात्र, पालिकेचा मुद्दा आल्यानंतर ते नगराध्यक्षांविरोधात काकू- नाना आघाडीच्या झेंड्याखाली आंदोलन करतात.

गुरुवारी शहरातील भूयारी गटार योजनेला नगराध्यक्ष उशिर लावत असल्याचा आरोप करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

Web Title: NCP vs NCP for the underground drainage scheme In Beed