मराठवाड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद : राज्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या परळीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना चारीमुंड्या चीत करत परळीचे नगराध्यक्षपद व पालिकाही ताब्यात घेतली. मराठवाड्यात सत्ताधारी भाजप- शिवसेनेच्या इतर मंत्र्यांनाही आपापल्या गावांत पराभवाची चव चाखावी लागली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भोकरदनमध्ये नगराध्यक्षपद कॉंग्रेसने प्राप्त केले. स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी मंदाताई लोणीकर यांचा कॉंग्रेसच्या विमल जेथलिया यांनी पराभव केला. शिवसेनेचे मराठवाड्यातील एकमेव मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यात शिवसेना व भाजप पुरस्कृत उमेदवाराला अत्यंत सपाटून मार खावा लागला. कॉंग्रेसच्या संगीता गोरंट्याल यांनी शकुंतला कदम यांचा तब्बल 53,830 इतक्‍या मोठ्या मताधिक्‍याने पराभव केला.

मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांत झालेल्या 27 नगरपालिकांत नगराध्यक्षपदांच्या लढतीत 10 नगराध्यक्षपदे मिळवत राष्ट्रवादीने आघाडी मिळविली. आठ नगराध्यक्षपदे मिळवत कॉंग्रेस दुसऱ्या, तर चार पदे मिळवत शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात भाजप हे पद मिळवण्यात आघाडीवर असला, तरी मराठवाड्यात त्यांची पिछाडी झाली आहे. मराठवाड्यात केवळ तीन पदे भाजपला मिळाली आहेत. सेलू व माजलगावात स्थानिक आघाड्यांकडे हे पद गेले आहे. पालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळविण्यातही राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीकडे दहा, शिवसेना व कॉंग्रेसकडे प्रत्येकी तीन, भाजपकडे दोन, तर त्रिशंकू सहा, आघाड्यांकडे दोन पालिका गेल्या आहेत.

Web Title: NCP wins in Marathwada