पेट्रोल दरवाढीचा गाजर वाटून निषेध ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परभणीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता.10) पेट्रोलपंपावर गाजर वाटो आंदोलन केले.

परभणी : पेट्रोल दरवाढीच्या विरोधात येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता.10) पेट्रोलपंपावर गाजर वाटो आंदोलन केले.

दिवसेदिवस पेट्रोलचे दर वाढत जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला पेट्रोल घेणे परवडत नाही. परंतु अत्यावश्यक असल्याने पेट्रोल खरेदी करावी लागते. या पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने वसमत रस्त्यावरील पेट्रोलपंपावर गाजर वाटो आंदोलन केले. पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गाजर देऊन केंद्र शासनाने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

या आंदोलनात किरण तळेकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ, सुदर्शन काळे, दीपक वारकरी, ओंकार वडकुते, गंगा ठाकूर, गजानन घाडगे, वैभव मांगणगावकर, इमत्याज शेख, पुरुषोत्तम शिंदे, विजय कदम आदींची उपस्थिती होती.

Web Title: NCP youth agitation against Petrol Prices Hike