अंगणात येऊन हिसकावले गळ्यातील मंगळसूत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

लातूर : रस्त्यावरून पायी जाणाऱ्या किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत; पण आता मात्र घराच्या अंगणात येऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र  हिसकावून नेण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे. विशेष म्हणजे, पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी हा डाव साधला. त्यामुळे महिलांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लातूरात घरफोड्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यात दुचाकी चोरीच्या घटना तर दररोजच घडत आहेत. तर दुसरीकडे गंठण चोरीच्याही घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाला आहे, अशीच स्थिती लातूरात निर्माण झाली आहे. त्यातच आता घराच्या अंगणात बसलेल्या महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे.

जुना औसा रस्ता परिसरातील सरस्वती कॉलनीत कस्तुरबाई अप्पाराव कावळे (वय 60) यांचे घर आहे. त्या अंगणात बसल्या होत्या. तेवढ्यात मोटार सायकलवरून दोन तरुण तेथे आले. ‘आम्ही पोलिस आहोत, इकडे या’ असे सांगून कावळे यांना दोघांनी गेटजवळ बोलावून घेतले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत दुचाकीवरील एकजन खाली उतरला आणि प्रवेशद्वारातून अंगणात आला. बोलण्यात गुंतवून ठेवत कावळे यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून दोघांनी लगोलग पळ काढला. हा प्रकार मंगळवार (ता. 25) दुपारी घडला. कावळे यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिस निरिक्षक एन. व्ही. लाकाळ या घटनेचा तपास करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neck less stoles at area front of home