दलित, मराठा, मुस्लिम मोट बांधण्याची गरज - टिपू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

औरंगाबाद - स्वराज्यात, इंग्रज काळात ज्यांनी गद्दारी केली तेच आता सत्ता भोगत आहेत, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यास दलित, मराठा, मुस्लिम अशी मोट बांधण्याची गरज आहे. असे मत टिपू सुलतान यांचे वंशज शहजादे मन्सूर अलिशहा टिपू यांनी मांडले. संभाजी ब्रिगेडच्या स्वराज्य संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

औरंगाबाद - स्वराज्यात, इंग्रज काळात ज्यांनी गद्दारी केली तेच आता सत्ता भोगत आहेत, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यास दलित, मराठा, मुस्लिम अशी मोट बांधण्याची गरज आहे. असे मत टिपू सुलतान यांचे वंशज शहजादे मन्सूर अलिशहा टिपू यांनी मांडले. संभाजी ब्रिगेडच्या स्वराज्य संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

संभाजी ब्रिगेडची कडा मैदानावर रविवारी (ता. ९) सभा झाली. शहजादे मन्सूर अलिशहा टिपू प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी महासचिव सौरभ खेडेकर, प्रा. गंगाधर बनबरे, रेखा चव्हाण, पप्पू भोयर, डॉ. सुदर्शन तारख, डॉ. शिवानंद भानुसे, रमेश गायकवाड यांची उपस्थिती होती.

मन्सूर अलिशहा टिपू म्हणाले, देशात मराठा आणि मुस्लिमच खरे वॉरियर्स आहेत. याचा इतिहास साक्ष आहे. आता जे सत्तेत आहेत, ते इंग्रज येण्यापूर्वी, आल्यानंतर तसेच आताही फसवणूकच करत आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हीदेखील धूळफेक आहे. यापुढे आपण मराठा- मुस्लिम आरक्षणासाठी एकमेकांसोबत राहू.

श्री. खेडेकर म्हणाले, मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये झालाच पाहिजे. ओबीसी संघटनांची दोन-चार बांडगुळे सत्ताधाऱ्यांकडून पॅकेज घेऊन मराठा आरक्षणावर तुटून पडत आहेत. त्यांनी असले धंदे बंद करावे. प्रा. बनबरे यांनी नावाला संविधान असून समांतर कायदे तयार होत असून, हिटलरशाही अस्तित्वात येत आहे. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे सांगितले. डॉ. भानुसे यांनीही भाजपने देऊ केलेले मराठा आरक्षण टिकले, तर राजकारण सोडून देईन. तसेच ओबीसीतूनच आरक्षण टिकेल, असेही म्हणाले. तसेच डॉ. बालाजी जाधव यांनी समृद्धी महामार्गात आदिवासींच्या जमिनी गेल्याने मार्गाला बिरसा मुंडा यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली.

स्वबळावर लढणार - आखरे
येणाऱ्या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. लोकसभेच्या ३०, तर विधानसभेच्या १०० जागा लढविण्यात येतील. अशी घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी केली. 

Web Title: Need to build Dalit Maratha and Muslim motions says Shajade Mansur Alishaha Tipu