भाजपचे जातीयवादी राजकारण संपवण्याची गरज : खासदार विरसिंग 

अनिलकुमार जमधडे 
मंगळवार, 12 जून 2018

औरंगाबाद : भाजपने जातीयवादी राजकारण सुरु केले, गायीच्या आणि रामाच्या नावाने राजकारण करुन दुही माजवण्याचे काम भाजप करत आहे. आगामी निवडणूकीत भाजपच्या विरोधात सर्व पक्षाने एकत्र आले पाहिजे अशी अपेक्षा बसपाचे खासदार विरिंग यांनी केली. 

बसपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यापुर्वी खासदार विरसिंग यांनी मंगळवारी (ता. बारा) पत्रकारांशी संवाद साधला. मायावतींना सर्वच पक्षांनी नेता मानले आहे. त्यामुळे रिब्लिकन पार्टी  आॅफ इंडियाच्या सर्व गटांनी मायावतींच्या सोबत यावे असे आवाहन त्यांनी केले. आगामी निवडणुकीच्या अनुशंगाने मुस्लिम, बहुजन, दलित अदिवासी अशा विविध घटकांना भाजपचे जातीयवादी राजकारण समजून सांगण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. 

भाजपने दिलेले एकही अश्‍वासन पाळले नाही, उलट महागाई गगणाला भिडली, पेट्रोलचे भाव आवाक्‍याच्या बाहेर गेले, ही भाजपचे देणे आहे. मात्र आता हे लोकांच्या लक्षात आल्याने येत्या निवडणूकीत मतदार भाजपला जागा दाखवतील यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष जयप्रकाशसिंग, महाराष्ट्राचे प्रभारी खासदार अशोख सिद्धार्थ, प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, ना. तु. खंदारे यांची उपस्थिती होती. 
 
Web Title: Need to end BJP's communal politics: MP Vir Singh