'फुले, आंबेकर यांचे विचार घेऊन लढण्याची गरज'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

औरंगाबाद-  युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचाच नव्हे तर दलित्तेतरांचाही विचार केला.  जीवनाच्या,  प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा विचार बाबासाहेबांनी केला आहे. 21 वे शतक चांगले जावे असे वाटत असेल तर महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन लढावे लागेल असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद लुलेकर यांनी रविवारी (ता. 8)  औरंगाबाद येथे बोलताना व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मानवमुक्ती तथा आंबेडकरी विचार चळवळीतील समता संगराच्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये, भन्ते उपगुप्त , प्रकाश त्रिभुवन,  डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. सुशीला मूल जाधव, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार, माजी न्यायमूर्ती डी. आर. शेळके,  डॉ. प्रदीप दुबे, डॉ. प्रकाश शिरसट, नंदकुमार नाईक, जनार्दन मस्के, भीमराव सरवदे, डॉ. स्मिता अवचार, डॉ. मिलिंद रणवीर, सुधाकर झीने यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड होते.

Web Title: The need to fight with the thoughts of Phule, Ambekar