"नीट' परीक्षेत "क्रिएटिव्ह'ची गगनभरारी !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

नांदेड - वैद्यकीय प्रवेश पूर्व (नीट) परीक्षेचे "हब' अशी नांदेडची ओळख निर्माण होते आहे, ही कौतुकाची बाब आहे. या वर्षीच्या निकालांत "क्रिएटिव्ह फिजिक्‍स'चे देशात पहिल्या शंभरांत चार, तर सहाशेपेक्षा जास्त गुण असणारे दहा विद्यार्थी आहेत; तसेच भौतिकशास्त्र विषयात 100 पेक्षा जास्त गुण मिळविणारे जवळपास 60 हून अधिक विद्यार्थी आहेत, ही बाबदेखील नांदेडकरांसाठी आनंददायी असल्याचे, येथील "क्रिएटिव्ह फिजिक्‍स' क्‍लासेसचे संचालक प्रा. रमाकांत जोशी यांनी सांगितले.

"नीट' परीक्षेत "क्रिएटिव्ह फिजिक्‍स'चा विद्यार्थी कृष्णा अग्रवाल याने 720 पैकी 685 गुण मिळवून राज्यात प्रथम, तर देशात सातवा क्रमांक; तर तेजस्विनी बनबरे हिने 720 पैकी 665 गुण मिळवून मुलींमध्ये राज्यात प्रथम, तर देशात चोपन्नावा क्रमांक पटकाविला आहे.

"क्रिएटिव्ह'चे प्रशांत वायाळ आणि अभिजित कदम या दोन विद्यार्थ्यांनी देशात अनुक्रमे 64 व 98वा क्रमांक मिळवला.

नांदेडसारख्या निमशहरी भागातून चार विद्यार्थ्यांनी पहिल्या शंभरात स्थान मिळवत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे, असे जोशी म्हणाले.
"नीट' परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेता परीक्षेपूर्वी सराव महत्त्वाचा आहे. तीन महिने अनेक चाचणी परीक्षा दिल्या, तर विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगलाच सराव होईल आणि अमुक एका प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकतो का, याचाही अंदाज आणि आत्मविश्वास येऊ शकेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

सरांनी एकदा फिजिक्‍सचा वर्ग घेतला की सर्वांच्या मनातील फिजिक्‍स विषयाची भीती नाहीशी होते. सरांची शिकवण्याची पद्धत साधी आणि तितकीच सोपी आहे. मनातल्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे मिळतात. त्यामुळे पुढील दिशा स्पष्ट होत जातात.
- कृष्णा अग्रवाल, विद्यार्थी

Web Title: NEET exam creative physics education