अँटिजेन चाचणीत निगेटिव्ह, स्वॅब घेताच कोरोना पॉझिटिव्ह, हा काय आहे प्रकार?

अविनाश काळे
Monday, 14 September 2020

शेतीत मेहनतीचे काम करत भाजीपाला पिकवून गावोगावी दुचाकीवर घरपोच विक्री करणारे एकूरगावाडी येथील शेतकऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांनी सरकारी कोविड रूग्णालयात जाण्याचा मार्ग दाखविला. तेथे त्यांची ॲन्टिजेन चाचणी घेण्यात आली. त्यात ते निगेटिव्ह आले, परंतू सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांचा अचानक मृत्यू झाला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : त्रास जाणवू लागल्याने बारा तासांच्या आतच एकूरगावाडी येथील एका ७२ वर्षीय शेतकऱ्याचा रविवारी (ता.१३) रात्री येथील सरकारी कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान प्रारंभी ॲन्टिजेन चाचणीत निगेटिव्ह आणि स्वॅबची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने अंत्यसंस्कारासाठी विलंब झाला. सोमवारी (ता.१४) सायंकाळी सहा वाजता शेतकऱ्यावर शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेतीत मेहनतीचे काम करत भाजीपाला पिकवून गावोगावी दुचाकीवर घरपोच विक्री करणारे एकूरगावाडी येथील शेतकऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांनी सरकारी कोविड रूग्णालयात जाण्याचा मार्ग दाखविला. तेथे त्यांची ॲन्टिजेन चाचणी घेण्यात आली. त्यात ते निगेटिव्ह आले, परंतू सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांचा अचानक मृत्यू झाला. नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी रात्रीच मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली.

‘आरटीई’त गैरप्रकार उघड, खोट्या माहितीवर शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न

मात्र स्वॅबचा अहवाल आल्यानंतर मृतदेह देता येत नाही, अशी भूमिका रूग्णालय प्रशासनाने घेतली. यातून मनसेचे तालुकाध्यक्ष हरी जाधव आणि डॉक्टरामध्ये किरकोळ वाद झाल्याची माहिती सांगण्यात आली. स्वॅबचा अहवाल उशीरा येणार असल्याने श्री.जाधव यांनी सोमवारी दूपारी उस्मानाबादची प्रयोगशाळा गाठली. तेथे चौकशी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सायंकाळी रुग्णालय प्रशासनाने पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मृतदेह ताब्यात दिल्यानंतर शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीत नातेवाईकांच्या उपस्थितीत त्या शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान श्री.जाधव व त्यांच्या नातेवाईकांना शेतकऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह कसा आला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र वैद्यकीय सल्ला आणि अहवालही महत्वाचा असतो. धोका पत्कारुन घेतलेला निर्णय अडचणीत येऊ शकतो. या संदर्भात मनसेचे तालुकाध्यक्ष श्री.जाधव यांनी रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन मृतदेह मिळण्यासाठी याचना करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली तर डॉ. प्रविण जगताप यांनी गंभीर अवस्थेत आलेल्या त्या व्यक्तीवर उपचार सुरू केले. मात्र दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कोविड नियमावलीनुसार मृतदेह देण्याची प्रक्रिया करावी लागते. नातेवाईकांचे फोनवरून केलेले बोलणे संयुक्तिक नव्हते असे ते म्हणाले.

जालना जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; आंदोलने, उपोषण, मोर्चे आणि निदर्शने...

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Negative In Antigen Test, Then Positive In Swab