औरंगाबाद - सिडको एन-आठ येथील नेहरू उद्यानात साठविलेल्या कचऱ्याला सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी माथेफिरूंनी आग लावली. सकाळी सातच्या सुमारास लागलेली आग साडेनऊच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी विझविली.
सिडको एन-आठ येथील नेहरू उद्यानात पाच गाळे असून, सर्व गाळ्यांत कचरा साठविलेला आहे. लपूनछपून या गाळ्यांत कचरा साठविला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कचऱ्याला माथेफिरूंनी आग लावली. आग वाढल्याने सर्वत्र घाणेरडा वास आणि धूर झाला. त्यामुळे उद्यानात आलेल्या बालकांसोबतच वृद्धांना त्रास जाणवू लागला. काही वेळातच उद्यान रिकामे झाले. दरम्यान, अग्निशमन दलाचे इन्चार्ज विजय राठोड, संजय कुलकर्णी, अजिंक्य भगत, अनिल मुंडे, प्रशांत गायकवाड, एस. वाय. व्हाण, भंडारे या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बंबाद्वारे त्यांनी पाचपैकी तीन गाळ्यांमधील कचऱ्याला लागलेली आग दोन ते अडीच तासांत विझविली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.