उमेदवारांच्या जीपला अपघात; एक ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

नेकनूर (ता. बीड) - ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडकडे निघालेल्या उमेदवारांच्या जीपला अपघात होऊन नेकनूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे बंधू शेख वशिद अन्वर (वय 34) यांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.

बीड तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या नेकनूर ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी (ता. 26) मतदान झाले. बीड तहसील कार्यालयात आज मतमोजणी होती. यासाठी सकाळी निकाल ऐकण्यासाठी सरपंच शेख अर्शद अन्वर, बंधू शेख वशिद व सदस्यपदाचे काही उमेदवार जीपमधून बीडकडे निघाले. वशिद अन्वर जीप चालवत होते. परिसरातील प्रमिलादेवी महाविद्यालयासमोर त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप शेतात 60 फूट अंतरावर जाऊन उलटली. जीपखाली दबून अन्वर यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: neknur beed news jeep accident