पुतण्याने केला काकाचा खून; सोनखेड ठाण्यात गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

लोहा तालुक्यातील बोरगाव कोल्हे येथे राहणारे आनंदा ज्ञानोबा घाटोळ (वय ४८) यांचा आणि त्यांचा पुतण्या यांच्यात घराच्या जागा वाटपावरून नेहमीच वाद होत असे.

नांदेड : घराच्या जागा वाटणीवरून पुतण्याने काकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी साडेसातच्या सुमारास बोरगाव कोल्हे (लोहा) येथे घडली. 

लोहा तालुक्यातील बोरगाव कोल्हे येथे राहणारे आनंदा ज्ञानोबा घाटोळ (वय ४८) यांचा आणि त्यांचा पुतण्या यांच्यात घराच्या जागा वाटपावरून नेहमीच वाद होत असे. यातच शनिवारी आनंदा घाटोळ हे सकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या आपल्या शेताता गेले होते. त्यांच्या मागावरच असलेल्या पुतण्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व काठीने मारून त्याचा निर्घृण खून केला. सोनखेड पोलिसांनी आनंदा घाटोळ यांचा मृतदेह विष्णुपूरी येतील शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दुरपडे पाटील यांनी ही माहिती दिली असून या प्रकरणी सध्या तरी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगितले.

Web Title: Nephew Killed His Uncle At Borgaon Kolha Loha