मुलाप्रमाणे सांभाळलेल्या भाच्याने केला मामीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

बालपणापासून मुलगा समजून संगोपन केलेल्या वीसवर्षीय भाच्याने सख्ख्या मामीवर राहत्या घरी बलात्कार केला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना गुरुवारी (ता. दहा) रात्री पांढरी पिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथे घडली. याबाबत रविवारी (ता. 13) पीडित मामीने दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिसांनी वीसवर्षीय संशयित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

करमाड (जि.औरंगाबाद) : बालपणापासून मुलगा समजून संगोपन केलेल्या वीसवर्षीय भाच्याने सख्ख्या मामीवर राहत्या घरी बलात्कार केला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना गुरुवारी (ता. दहा) रात्री पांढरी पिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथे घडली. याबाबत रविवारी (ता. 13) पीडित मामीने दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिसांनी वीसवर्षीय संशयित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

हा भाचा मूळचा नगर जिल्ह्यातील असून, तो लहानपणापासून पांढरी पिंपळगाव येथील मामाकडे वास्तव्यास आहे. दरम्यान, मुलाप्रमाणे सांभाळलेल्या मामीवरच त्याची काही दिवसांपासून वाकडी नजर होती. गुरुवारी (ता. दहा) रात्री घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने जबरदस्ती करून मामीवर बलात्कार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास मामीसह मामाला ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, याबाबत पतीने विश्‍वासात घेत पत्नीला विचारपूस केली असता नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा उलगडा झाला. यावरून पीडितेने रविवारी (ता.13) पहाटे करमाड पोलिस ठाणे गाठून बलात्काराची तक्रार दिली. घटनेनंतर आरोपी फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nephew Raped Aunt