उस्मानाबाद जिल्ह्यात ३० नवीन कोरोना रुग्ण, दोघांचा मृत्यू

20coronavirus_105_0
20coronavirus_105_0

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये ३० नवीन कोरोना रुग्णांची सोमवारी (ता.२६) भर पडली असून दोघांचा बळी गेला आहे. तसेच ५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत १२ हजार ९९५ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यामुळे जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) वाढुन ९१.३१ इतका झाल्याचे दिसून येत आहे. मृत्यु होणाऱ्यांचे जिल्ह्यातील प्रमाण आता कमी झालेले असले तरी परजिल्ह्यातील मृताचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्याचा मृत्यदर कमी होत नसल्याचे चित्र आहे. मृत्यदर ३.४८ टक्के एवढा झाला आहे.


सोमवारी वाढलेल्या ३० रुग्णांपैकी २० जण आरटीपीसीआरद्वारे तपासणीत पॉझिटिव्ह आले तर नऊ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उस्मानाबाद ११, तुळजापुर दोन, उमरगा दोन, कळंब आठ, वाशी सहा, भुम एक लोहारा व परंडा येथे एकही नवा रुग्ण सापडला नाही. उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील ७६ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला आहे. भुम तालुक्यातील ईट येथील ६५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १४२७२
बरे झालेले रुग्ण - १२९९५
उपचाराखाली रुग्ण - ७४२
एकुण मृत्यु - ४९५
आजचे बाधित - ३०
आजचे मृत्यु - ०२

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com